T20I Rankings: आयसीसी (ICC) टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) पाकिस्तानविरुद्ध दमदार फलंदाजी केली. या सामन्यात विराटनं अवघ्या 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला, ज्याचा फायदा त्याला आयसीसी टी-20 क्रमवारीत झालाय. आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या टी-20 क्रमवारीत विराट कोहलीनं थेट नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर, भारताविरुद्ध गोल्डन डकचा शिकार ठरलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचं (Babar Azam) मोठं नुकसान झालं असून त्याची चौथ्या स्थानावर घसरण झालीय. 


ट्वीट-






 


सूर्यकुमार यादवची घसरण
भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) पाकिस्तानविरुद्ध सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं त्याची तिसऱ्या स्थानावर घसरण झालीय. तर, पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) अव्वल स्थानी कायम आहे. तर, न्यूझीलंडच्या डेवॉन कॉन्वेने सूर्यकुमार यादव आणि बाबर आझम यांना मागं टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे.


टी-20 क्रमवारीच्या टॉप-10 मध्ये दोन भारतीय
आयसीसी टी-20 च्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली हे दोनच भारतीय आहे.  दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम पाचव्या तर इंग्लंडचा डेव्हिड मलान सहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच सातव्या, श्रीलंकेचा पाथुम निसांका आठव्या क्रमांकावर आणि यूएईचा मोहम्मद वसीम दहाव्या क्रमांकावर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या क्रमवारीत 16व्या आणि केएल राहुल 18व्या स्थानावर आहे.


ट्वीट-






 


हे देखील वाचा-