T20 World Cup 2022: आयर्लंडविरुद्ध  खेळण्यात आलेल्या सुपर-12 फेरीतील सामन्यात पावसानं इंग्लंडच्या (England vs Ireland) तोंडातून विजय हिसकावून घेतलाय. मेलबर्न क्रिकेट मैदानावर (Melbourne Cricket Ground) खेळल्या गेलेल्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणलं. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमांच्या अंतर्गत आयर्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयर्लंडचा डाव 19.2 षटकातच 157 धावांवर आटोपला. त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघ संघर्ष करताना दिसला. दरम्यान, 14.3 षटकात इंग्लंडच्या संघानं पाच विकेट्स गमावून 105 धाव केल्या असताना पावसाला सुरुवात झाली. अखेर या सामन्याचा निकाल डेकवर्थ लुईसद्वारे लावला गेला.  


या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली. आयर्लंडनं 10 षटकात 100 धावा केल्या. मात्र, त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत आयर्लंडच्या संघाला 19.2 षटकात 157 धावांवर ऑलआऊट केलं. इंग्लंडकडून मार्क वुड आणि लियाम लिव्हिंगस्टोननं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर, सॅम करनच्या खात्यात दोन विकेट्स जमा झाल्या. आयर्लंडकडून कर्णधार अँडी बालबर्नीनं सर्वाधिक 62 धावांची खेळी केली.


ट्वीट-




 


आयर्लंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली. पावर प्लेच्या आत इंग्लंडच्या संघानं 29 धावांत तीन महत्वाचे विकेट्स घेतले. इंग्लंडच्या डावातील 14.3 षटकानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी इंग्लंडचा संघानं पाच विकेट्स गमावून 105 धावा केल्या होत्या. हा सामना इंग्लंडच्या संघाला जिंकता आला असता. परंतु, पावसामुळं खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही. अखेर आयर्लंडच्या संघाला डेकवर्ड लुईसच्या नियमांतर्गत 5 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. इंग्लंडचा संघ आता ग्रुप 'अ' च्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.  इंग्लंडकडून डेव्हिड मलाननं 35 धावा केल्या. तर, मोईन अलीनं 12 चेंडूत नाबाद 24 धावांची खेळी केली.


हे देखील वाचा-