ICC Rankings नवी दिल्ली : इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल म्हणजेच आयसीसीनं आज टी-20 क्रिकेटच्या रँकिंगची (ICC Rankings) घोषणा केली आहे.अफगाणिस्तानच्या राशिद खाननं (Rashid Khan) कमरेच्या दुखापतीनंतर कमबॅक केल्यांनंतर  कामगिरीच्या जोरावर मुसंडी मारली आहे. राशिदच्या रँकिंगमध्ये 4 स्थानांची सुधारणा झाली आहे. राशिद खान बॉलिंगच्या रँकिंमध्ये आता 9 व्या स्थानवर आहे.  राशिद खाननं आयरलँड विरुद्धच्या 3 मॅचमध्ये 8 विकेट काढल्या होत्या. राशिद खाननं या  कामगिरीच्या जोरावर टॉप 10 मध्ये कमबॅक केलं आहे.  दुसरीकडे टीम इंडियाचा स्फोटक बॅटसमन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फलंदाजीत पहिल्या स्थानवर कायम आहे.  


सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर कायम


टीम इंडियाचा बॅटसमन सूर्यकुमार यादव टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा फिल सॉल्ट आहे. बॅटिंग रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही. टी-20 च्या बँटिंग रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये सध्या बदल झालेला नसून सध्या सूर्यकुमार यादवशिवाय टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल देखील आहे. यशस्वी जयस्वाल सहाव्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा दुसरा खेळाडून नवीन उल हक 55 व्या स्थानावर आहे. आयरलँडचा जोशुला लिटील 39 व्या आणि मार्क एडर 56 व्या स्थानवर आह. बैरी मैक्कार्थी यानं 15 स्थानांची झेप घेत 77 वं स्थान पटकावलं आहे.  


राशिद खानची टॉप 10 मध्ये एंट्री  


अफगाणिस्तानच्या राशिद खाननं आयरलँडच्या विरोधातील मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्यानं तीन मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या होत्या.त्यामुळं राशिद खाननं टॉप 10 मध्ये प्रेवश केला आहे. राशिद खान 9 व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा मिशेल सँटनर  8 व्या स्थानावर आहे. टी-20 बॉलिंग रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आदिल रशीद आहे. दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा बॉलर वानिंडू हसरंगा आहे. भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल चौथ्या आणि रवि बिश्नोई पाचव्या स्थानावर आहे. अक्षर पटेल आणि रवि बिश्नोई या दोघांशिवाय टॉप 20 मध्ये दुसरा कोणताही गोलंदाज नाही. 


वनडे क्रिकेटच्या रँकिंगमध्ये देखील काही बदल झाले आहेत. भारताचा कॅप्टन रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा पाथुम निसांका 8 व्या स्थानवर आला आहे. वनडेच्या बॉलरच्या रँकिंगमध्ये मोहम्मद नबी आता सहाव्या स्थानावर आहे.  


दरम्यान, सूर्यकुमार यादव गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. सूर्यकुमार यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना सूर्यकुमार यादवच्या पायावर ताण आल्यानं तो दुखापतग्रस्त झाला होता. टीम इंडियानं अखेरची टी-20 मालिका अफगाणिस्तान विरुद्ध खेळली आहे. आता टीम इंडिया थेट वर्ल्ड कपमध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार आहे. 


संबंधित बातम्या : 


Shreyanka Patil : क्रिकेट ज्याच्यासाठी पाहत होते,त्यांना माझं नाव... विराटच्या भेटीनंतर श्रेयंका पाटीलचं ट्विट


Hardik Pandya:मुंबईनं पुन्हा हार्दिक पांड्यावर विश्वास का दाखवला? तीन वर्षात नेमंक काय घडलं?