चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) महिला संघाची ऑलराऊंडर श्रेयंका पाटील (Shreyanka Patil) हिनं नुकतीच टीम इंडियाचा आणि आरसीबीचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) भेट घेतली आहे. डब्ल्यूपीएलमधील (WPL) विजयानंतर श्रेयंका पाटील हिची देशभर चर्चा सुरु होती. मंगळवारी श्रेयंकानं विराटची भेट घेतली यावेळी काय घडलं ते तिनं सांगितलं आहे. 


आरसीबीच्या महिला टीमचा डब्ल्यूपीएलमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर  सन्मान करण्यात आला.स्मृती मानधना हिच्या नेतृत्त्वातील टीमचा गौरव करण्यात आला. विराट कोहली आणि टीममधील इतर खेळाडूंकडून गार्ड ऑफ ऑनर आरसीबीच्या महिला टीमला देण्यात आला. आरसीबीच्या टीमनं आयपीएल सुरु झाल्यानंतर पहिलं विजेतेपद पटकावलं आहे. यामुळं विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


श्रेयंका पाटील हिनं विराट कोहली सोबतच्या भेटीबाबत पोस्ट केली आहे. विराट कोहली हा क्रिकेट पाहण्याचं कारणं होतं, आता तोच आपल्या कामगिरीचं कौतुक करत आहे,असं तिनं म्हटलं आहे. श्रेयंका पाटील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरील पोस्टमध्ये म्हणते की,तिनं क्रिकेट पाहण्यास सुरुवात विराट कोहलीमुळं केली होती. विराट सारखं होण्याचं स्वप्न बाळगून मोठी झाली आणि काल आयुष्यात तो क्षण आलाच, असं श्रेयंका पाटील हिनं म्हटलं आहे. 


विराट कोहलीनं काय म्हटलं हे देखील श्रेयंका हिनं सांगितलं आहे. ती म्हणते, विराट म्हणाला, हाय श्रेयंका चांगली बॉलिंग केली. विराट कोहलीला माझं नाव माहिती होतं, असं देखील तिनं म्हटलं आहे. 






कोण आहे श्रेयंका पाटील?


श्रेयंका पाटील ही मूळची कर्नाटकची आहे. ती ऑलराऊंडर असून तिनं भारतीय महिला संघात देखील प्रतिनिधीत्व केलं आहे. 2023 मध्ये तिनं टीम इंडियात पदार्पण केलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 30 डिसेंबरला श्रेयंका पाटील हिनं पदार्पण केलं होतं. टी-20 क्रिकेटमध्ये तिनं मंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 6 डिसेंबरला इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये पदार्पण केलं आहे.


श्रेयंका पाटील हिनं वनडे मध्ये 4 तर टी-20 मध्ये 8 विकेट घेतल्या आहेत.टीम इंडियाकडून तिनं 2 वनडे तर टी-20 चे 6 सामने खेळले आहेत. श्रेयंका पाटील हिनं  डब्ल्यूपीएलच्या दोन्ही सीझनमध्ये पर्पल कॅफप मिळवली आहे. श्रेयंका पाटील हिनं यंदाच्या डब्ल्यूपीएलमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरोधातील फायनलच्या लढतीत श्रेयंका पाटील हिनं 12 धावांमध्ये 4 विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.  


संबंधित बातम्या :


 Hardik Pandya:मुंबईनं पुन्हा हार्दिक पांड्यावर विश्वास का दाखवला? तीन वर्षात नेमंक काय घडलं?


MS Dhoni: गुड न्यूज, धोनी यंदाचं आयपीएल गाजवणार, सराव सत्रात हेलिकॉप्टर शॉट मारत दिले संकेत, व्हिडिओ समोर