मुंबई : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya)नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 2023 च्या आयपीएलच्या उपविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध 24 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लढणार आहे. मुंबई इंडियन्ससमोरच्या अडचणी कमी होत नसल्याचं चित्र आहे.आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)दुखापतीमुळं फिट झालेला नाही. टीम मॅनेजमेंट आता नेहाल वढेराला संधी देण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानी फलंदाजीला येत असल्यानं त्याच्या जागी हार्दिक पांड्याला फलंदाजी करावी लागेल. गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये  झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मुंबईच्या टीमकडे आहे.  


हार्दिक पांड्या चौथ्या स्थानी खेळणार


सूर्यकुमार यादवची मिस्टर 360 डिग्री अशी ओळख निर्माण झालेली आहे. सूर्यकुमार यादव गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये संघात नसल्यानं हार्दिक पांड्याला त्याच्या जागी फलंदाजी करावी लागणार आहे. हार्दिक पांड्या मागील दोन हंगामामध्ये गुजरात टायटन्सकडून चौथ्या स्थानी फलंदाजी करत होता. त्यामुळं सूर्यकुमार यादवची जागा भरुन काढण्याची जबाबदारी आता हार्दिक पांड्यावर असेल. 


नेहाल वढेराला टीममध्ये संधी 


मुंबई इंडियन्सच्या सर्व समीकरणांचा विचार केला असता ते सूर्या टीममध्ये नसल्यास नेहाल वढेराला संघात संधी देऊ शकतात. नेहाल वढेरा लोअर ऑर्डरला स्फोटक फलंदाजी करु शकतो त्याशिवाय  टीमला गरज असल्यास बॅटिंग देखील करु शकतो. 


मुंबईची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?


मुंबईच्या टीमचा विचार केला असता रोहित शर्मा, विकेटकीपर इशान किशन डावाची सुरुवात करतील. तिसऱ्या स्थानी तिलक वर्मा फलंदाजीसाठी येईल. कॅप्टन हार्दिक पांड्या चौथ्या स्थानी बॅटिंग करेल.यानंतर पाचव्या स्थानी नेहाल वढेरा, सहाव्या स्थानी अफगाणिस्तानचा सुपरस्टार मोहम्मद नबी बॅटिंग करेल. नबी टीममध्ये असल्यास मुंबईची बॉलिंग देखील मजबूत होईल. टीम डेविड आणि मोहम्मद नबी मुंबईसाठी मॅच फिनिशर म्हणून कामगिरी करु शकतात. 
पियूष चावला हा  मुंबईचा मुख्य स्पिनर असेल. तर, जसप्रीत बुमराह, आकाश मढवाल,नुवान तुषारा यांना संधी दिली जाऊ शकते. 


कशी असेल मुंबईची संभाव्य टीम


हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन(विकेट कीपर), तिलक वर्मा, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी, टीम डेविड, पियूष चावला, आकाश मढवाल, नुवान तुषारा, जसप्रीत बुमराह 
  
दरम्यान, मुंबईचा यंदाच्या आयपीएलमध्ये विजयानं सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. मुंबई इंडियन्सला 2021,2022,2023 या गेल्या तीन वर्षांमध्ये विजेतेपद पटकावता आलेलं नाही. मुंबईचा तीन वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. 


संबंधित बातम्या :


MS Dhoni: गुड न्यूज, धोनी यंदाचं आयपीएल गाजवणार, सराव सत्रात हेलिकॉप्टर शॉट मारत दिले संकेत, व्हिडिओ समोर


IPL: आयपीएलमध्ये एकही मॅच न खेळल्यास खेळाडूंना पैसे मिळतात का? पूर्ण रक्कम मिळते की नाही? जाणून घ्या नियम