ICC Cricket World Cup 2023 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये दिल्लीच्या मैदानात सामना सुरु आहे. या सामन्यात शार्दूल ठाकूरच्या फिल्डिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे. शार्दूल ठाकूर याने सीमारेषावर जबराट झेल घेतला. चेंडूवर जम बसलेल्या गुरबाजने हार्दिक पांड्याच्या चेंडूवर मोठा फटका मारला. हा षटकार जाणार असाच, सर्वांना असाच अंदाज होता. पण षटकाराच्या मध्ये लॉर्ड शार्दूल ठाकूर उभा होता. शार्दूल ठाकूर याने अचंबित करणारा झेल घेतला. शार्दूल ठाकूरच्या या झेलचे कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे.
अफगाणिस्तानचा कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाण फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. गुरबाज आणि जादरान यांनी आक्रमक सुरुवात केली. जसप्रीत बुमराह याने 22 धावांवर जादरान याला तंबूत पाठवले. त्यानंतर रहमत याच्यासोबत गुरबाज याने डाव सावरला. दोंघाची जोडी जमली, असे वाटत होते. त्याचवेळी हार्दिक पांड्या याने भारताला यश मिळवून दिले. पांड्याच्या गोलंदाजीवर गुरबाजने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण शार्दूल ठाकूर याने मस्त झेल घेतला. गुरबाज याने 28 चेंडूमध्ये एक षटकार आणि तीन चौकार लगावले.
शार्दूल ठाकूर याने जबरदस्त झेल घेऊन भारताला दुसरे यश मिळून दिले. त्यानंतर गोलंदाजीतही त्याने कमाल केली. शार्दूल ठाकूर याने रहमत शाह याला तंबूत पाठवले. रहमत शाह याने 22 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 21 धावांची खेळी केली.
शार्दूलला संधी -
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावली. दिल्लीच्या खेळपट्टीवर भारतीय संघाला प्रथम फिल्डिंगसाठी उतरावे लागले. भारतीय संघात एक बदल करण्यात आला. शार्दूल ठाकूर याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले तर अश्विनला आराम दिला. त्यानंतर मोहम्मद शामीच्या चाहत्यांचा राग अनावर आला. चाहत्यांनी रोहित शर्मासह टीम इंडियावर निशाणा साधला.