World Cup 2023 points table : विश्वचषकात मंगळावारी चाहत्यांसाठी दोन सामन्याची मेजवानी होती. इंग्लंड आणि बांगलादेश (ENG vs BAN) पहिला सामना झाला तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यामध्ये पार पडला. इंग्लंड आणि पाकिस्तान संघाने विजय मिळवला. तर बांगलादेश आणि श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशच्या पराभवाचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. होय, इंग्लंडचा विजय झाल्यामुळे भारतीय संघाने गुणतालिकेत एका स्थानाने झेप घेतली आहे. त्याशिवाय पाकिस्तान संघाने दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पक्के केले आहे. पाहूयात गुणतालिकेतील सध्याची स्थिती नेमकी कशी आहे.
न्यूझीलंड अव्वल, पाकिस्तान दुसरा -
न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाने विश्वचषकातील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. पण न्यूझीलंड संघाने दोन्ही सामन्या मोठ्या फरकाने बाजी मारली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. परिणामी चार गुणांसह न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. पहिल्याच सामन्यात 400 धावा चोपणारा दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका संगाचे नेटरनेरट + 2 पेक्षा जास्त आहे.
इंग्लंडच्या विजयचा भारताला फायदा -
मंगळवारी भारताचा सामना नव्हता, तरीही भारताला गुणतालिकेत फायदा झाला आहे. इंग्लंडने बांगलादेशचा पराभव करत विश्वचषकातील विजयाचे खाते उघडले. बांगलादेशचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघ पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानावर पोहचला आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा संघ दोन सामन्यात एक विजय एक पराभवासह पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर विराजमान आहे. बांगलादेश संघालाही एक विजय आणि एक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेचं खातेच उघडले नाही -
पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि एक वेळा चषक उंचावणारा श्रीलंका यांना विजयाचे खाते अद्याप उगडता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ सातव्या स्थानावर आहे. तर श्रीलंका संघाला आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंका संघ आठव्या स्तानावर आहे. अफगाणिस्तान नवव्या आणि नेदरलँड दहाव्या स्थानावर आहे. नेदरलँड संघालाही दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेटरनरेट |
1. New Zealand | 2 | 2 | 0 | 4 | +1.958 |
2. Pakistan | 2 | 2 | 0 | 4 | +0.927 |
3. South Africa | 1 | 1 | 0 | 2 | +2.040 |
4. India | 1 | 1 | 0 | 2 | +0.883 |
5. England | 2 | 1 | 1 | 2 | +0.436 |
6. Bangladesh | 2 | 1 | 1 | 2 | -0.561 |
7. Australia | 1 | 0 | 1 | 0 | -0.883 |
8. Sri Lanka | 2 | 0 | 2 | 0 | -1.161 |
9. Afghanistan | 1 | 0 | 1 | 0 | -1.438 |
10. Netherlands | 2 | 0 | 2 | 0 | -1.800 |