Social Media On Babar Azam : जगातील नंबर एक फलंदाज आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला सोशल मीडियावर सध्या ट्रोल केले जात आहे. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळवला, पण या सामन्यात बाबर आझमला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही सामन्यात बाबर आझमची बॅट शांतच राहिली. नेदरलँडच्या विरोधात बाबर आझम 5 धावा काढून तंबूत परतला होता. तर श्रीलंकाविरोधात 10 धावा काढून तंबूत परतला. जगातील अव्वल क्रमांकाचा बाबर आझम याची खालावलेली कामगिरी पाहून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत आहे. 


पाकिस्तानने आपल्या दुसर्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत गुणतालिकेत दुसरे स्थान निश्चित केले. 344 धावांचा पाकिस्तान संघाने यशस्वी पाठलाग केला. पण पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती. यामध्ये बाबर आझम याची कामगिरीही खराब होती. बाबर आझम याला श्रीलंकाविरोधात 15 चेंडूत फक्त 10 धावाच करता आल्या. मधुसंकाच्या चेंडूवर बाबर तंबूत परतला. त्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. 


 































बाबर आझम कमकुवत संघाविरोधात धावा करतो - 


मोठ्या संघाविरोधात बाबर आझम अययशी ठरतो, अशी टीका त्याच्यावर होते. पण पहिल्याच सामन्यात बाबरला मोठी खेळी करता आली नाही. विश्वचषकातील सर्वात कमकुवत नेदरलँडविरोधात बाबरला फक्त पाच धावा करता आल्या. या पाच धावासाठी बाबरने 18 चेंडूचा सामना केला. बाबरच्या कामगिरीची सोशल मीडियावर टीका केली जात आहे. बाबरवर निशाणा साधला जात आहे. बाबर आझमची अनेकदा विराट कोहलीशी तुलना केली जाते, त्यावरुनही नेटकऱ्यांनी बाबरची खिल्ली उडवली.