एक्स्प्लोर

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नियम बदलला; भारताचं नुकसान तर ऑस्ट्रेलियाला फायदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचं नुकसान झालं आहे. तर क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोविड-19 महामारीमुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघांचा निर्णय गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर घेतला जाईल, असं आयसीसीने सांगितलं. आयसीसीच्या या निर्णयामुळे भारतीय संघाला मोठं नुकसान झालं असून ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने अटी बदलण्यासाठी केलेल्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्याने संघाच्या गुणांची मोजणी होणार आहे.

आयसीसीने जारी केलेल्या नव्या क्रमावारीनुसार भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे, कारण ऑस्ट्रेलियाच्या गुणांची टक्केवारी 82.2 आहे जी भारताच्या 75 टक्क्यांपेक्षा फारच जास्त आहे. आयसीसीने संघांना सामन्यात मिळालेल्या विजयाच्या गुणांची टक्केवारी काढली आहे. ज्या मालिका कोविड-19 महामारीमुळे झाल्या नाहीत त्या अनिर्णित समजल्या गेल्या आहेत. आयसीसीच्या या नियमामुळे ऑस्ट्रेलियाला फायदा झाला आहे. तर भारताचं नुकसान झालं आहे.

आतापर्यंत भारतीय संघाचे चार मालिकांमध्ये 360 गुण आहेत आणि बदललेल्या नियमाच्या आधी भारतीय संघ क्रमवारीत प्रथम क्रमांकावर होता. तर तीन मालिकेमधील 296 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. परंतु गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. 60.8 टक्क्यांसह इंग्लंडचा संघ या क्रमवारीत भारतानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.

आता भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण इतर संघांकडेही आता वरच्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे. तर भारताविरुद्ध मायदेशी होणाऱ्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला फायदा होण्याची शक्यता आहे.

आता 2023 मध्ये आयसीसी महिला टी-20 विश्वचषक होणार यासोबतच 2022 मध्ये होणारा महिला टी-20 विश्वचषकही पुढे ढकलण्यात आला आहे. आता ही स्पर्धा 2023 मध्ये प्रस्तावित आहे. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 मध्ये 9 ते 26 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 Update : निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs WI 5th T20 : बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
Mumbai Indians IPL 2027 : मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget