CWC 2023 Reschedule : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 10 संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने विश्वचषक होणार आहे. स्थानिक स्थिती आणि काही संघाच्या विनंतीनंतर आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आयसीसीने नऊ सामन्यांच्या तारखा बदलल्या आहेत. यामध्ये भारताचे दोन सामन्यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी होणारा सामना आता 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे.
कोणत्या नऊ सामन्यात बदल झालाय, पाहा
10 ऑक्टोबर - इंग्लंड vs बांगलादेश , सकाळी 10.30 वाजता
10 ऑक्टोबर - पाकिस्तान vs श्रीलंका, दुपारी 2 वाजता
12 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका, दुपारी दोन वाजता
13 ऑक्टोबर - न्यूझीलंड vs बांगलादेश, दुपारी दोन वाजता
14 ऑक्टोबर - भारत vs पाकिस्तान, दुपारी दोन वाजता
15 ऑक्टोबर - इंग्लंड vs अफगाणिस्तान, दुपारी दोन वाजता
11 नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश, सकाळी 10.30 वाजता
11 नोव्हेंबर - इंग्लंड vs पाकिस्तान, दुपारी दोन वाजता
12 नोव्हेंबर - भारत vs नेदरलँड, दुपारी दोन वाजता
पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. गतविजेते आणि उपविजेत्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये पाच ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामनाही नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे. भारताची सलामीची लढत ऑस्ट्रेलियाविरोधात 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यंदाचा विश्वचषक 10 संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. विश्वचषकासाठी संघ घोषणा करण्याची अखेरची तारीख 27 सप्टेंबर इतकी आहे. आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलियाने आपल्या संभावित संघाची घोषणा केली आहे.
विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक पाहा -
भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबला'
तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तानी संघ भारतात येणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान हा महासंग्राम पाहण्याची संधी मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित वनडे विश्वचषक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी संघ फिजिओलॉजिस्टच्याही शोधात आहे. विश्वचषकात पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, 14 ऑक्टोबरला पाकिस्तानचा भारताविरुद्ध मोठा सामना होणार आहे.
आणखी वाचा :