Fans Get Angry On Skipper Hardik Pandya: करो या मरोच्या लढतीत भारतीय संघाने सात विकेटने विजय मिळवला. कुलदीप यादव याने गोलंदाजीत चुणूक दाखवली. तर फलंदाजीत सूर्यकुमार यादव आणि युवा तिलक वर्मा चमकला. सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतक ठोकले. पण तिलक वर्मा 49 धावांवर नाबाद राहिला. त्याला कारण हार्दिक पांड्या असल्याचे बोलले जातेय. हार्दिक पांड्या फलंदाजीला आला तेव्हा तिलक वर्मा 42 धावांवर खेळत होता. एखादा युवा फलंदाज अर्धशतक अथवा शतकाच्या जवळ असल्यानंतर सिनिअर खेळाडू जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक देतात. पण इथे उलटे झाले. हार्दिक पांड्याने तिलक वर्माला स्ट्राईक दिलीच नाही. त्यामुळे तिलक वर्माला दुसरे अर्धशतक ठोकता आले नाही. तिलक वर्मा 49 धावांवर नाबाद राहिला. तिलक वर्माचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही. सामन्यानंतर चाहत्यांनी हार्दिक पांड्यावर टीकास्त्र सोडले. हार्दिक पांड्याला चाहते स्वार्थी म्हणत आहे. तिलक वर्माचे अर्धशतक होऊ न दिल्याचा आरोप चाहत्यांकडून होतोय.
भारतीय क्रीडा चाहत्यांनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर ताशोरे ओढळे आहेत. हार्दिक पांड्याने तिलक वर्माचे दुसरे अर्धशतक होऊ दिले नाही. या सामन्या सुर्यकुमार यादव याने 83 धावांची खेळी केली. भारतीय संघाला विजयासाठी दोन धावांची गरज होती, त्यावेळी तिलक वर्मा 49 धावांवर होता. स्टाईकवर असणारा हार्दिक पांड्या 14 धावांवर होता. भारतीय संघाला 14 चेंडूत दोन धावा करायच्या होत्या. हार्दिक पांड्याने चेंडू निर्धाव न खेळता षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिला. पण त्यामुळे तिलक वर्माचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही. भारतीय संघाने 13 चेंडू राखून विजय मिळला. इतके चेंडू शिल्लक असताना हार्दिक पांड्याने तिलक वर्माला स्ट्राईक का दिली नाही.. हार्दिक पांड्या स्वार्थी क्रिकेटर आहे. यावेली अनेकांना माजी कर्णधार एमएस धोनी याचीही आठवण आली. धोनी आणि विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
2014 च्या टी 20 विश्वचषकातील प्रसंग अनेकांना आठवला. दक्षिण आफ्रिकाविरोधात भारतीय संघाने विजय मिळवला होता. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली होती. भारतीय संघाला सात चेंडूत एका धावेची गरज होती. त्यावेळी धोनी स्ट्राईकवर होता. धोनीने विजयी फटका मारण्याची संधी विराट कोहलीला दिली. धोनीने एक चेंडू निर्धाव खेळून काढले. पुढच्या चेंडूवर विराट कोहलीने चौकार मारत अर्धशतक ठोकले. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 72 धावांची खेळी केली.