ICC Women’s T20 World Cup 2025 Schedule UAE : आयसीसीने यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला टी-20 वर्ल्ड कप 2024चे नवीन वेळापत्रक जारी केले आहे. टी-20 वर्ल्ड कप यापूर्वी बांगलादेशमध्ये होणार होता पण राजकीय परिस्थितीमुळे तो यूएईला हलवावा लागला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा सामना दुबईत पाकिस्तानशी होणार आहे. 


6 ऑक्टोबर रोजी भारतीय महिला संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. याआधी भारतीय संघ 2 सराव सामनेही खेळणार आहे. या स्पर्धेचे आयोजन 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.






2020 च्या उपविजेत्या भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह सहा वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला अ गटात ठेवण्यात आले आहे. तर 2016 च्या चॅम्पियन वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंडसह दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला ब गटात ठेवण्यात आले आहे. श्रीलंका आणि स्कॉटलंड या वर्षाच्या सुरुवातीला अबू धाबी येथे झालेल्या आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरले होते.


महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत प्रत्येक संघाची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी दुबई येथे होणार आहे तर उपांत्य फेरी 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे.


उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस निश्चित करण्यात आला आहे. जर भारताने उपांत्य फेरी गाठली, तर त्याचा समावेश उपांत्यपूर्व 1 मध्ये होईल. दुबई आणि शारजाह या दोन ठिकाणी एकूण 23 सामने खेळवले जातील.


अ गट : ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका.


ब गट : दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, स्कॉटलंड.


महिला टी-20 वर्ल्ड कप 2024चे नवीन वेळापत्रक



  • 3 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजा

  • 3 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजा

  • 4 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई

  • 4 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई

  • 5 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजा

  • 5 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजा

  • 6 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई

  • 6 ऑक्टोबर : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई

  • 7 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजा

  • 8 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजा

  • 9 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई

  • 9 ऑक्टोबर : भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई

  • 10 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजा

  • 11 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई

  • 12 ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजा

  • 12 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई

  • 13 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजा

  • 13 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा

  • 14 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई

  • 15 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई

  • 17 ऑक्टोबर : उपांत्य फेरी 1, दुबई

  • 18 ऑक्टोबर : उपांत्य फेरी 2, शारजाह

  • 20 ऑक्टोबर : फायनल, दुबई