James Anderson on Retirement : ‘माझ्या डोक्यात निवृत्तीचा विचार नव्हता...’, भारत-इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी दिग्गज खेळाडूचा खळबळजनक खुलासा
इंग्लंडमध्ये होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शनिवार 24 मे रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
James Anderson on Retirement : इंग्लंडमध्ये होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शनिवार 24 मे रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची घोषणा होण्यापूर्वी, या महिन्याच्या सुरुवातीला 7 मे रोजी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली. रोहितच्या कसोटी सामन्यांमधून निवृत्तीच्या पाच दिवसांनंतर 12 मे रोजी विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याआधी 12 जुलै 2024 रोजी शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसनने वयाच्या 42 व्या वर्षी कसोटी क्रिकेटला निरोप दिला.
अँडरसनने 21 वर्षांची कारकीर्द संपवली, तेव्हा जग त्याला सलाम करताना दिसले. पण आता एक खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. खरंतर, अँडरसन अजिबात निवृत्त होऊ इच्छित नव्हता. जेम्स अँडरसनने याबद्दल खुलासा केला आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्याने म्हटले आहे की, ही निवृत्ती त्याच्या इच्छेने नाही तर संघ व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे झाली आहे. जेम्स अँडरसनने त्याच्या निवृत्तीबद्दल काय म्हटले ते जाणून घ्या?
ट्रेंडिंग
अँडरसनच्या निवृत्तीचे सत्य काय?
द इंडिपेंडेंटला दिलेल्या मुलाखतीत अँडरसनने सांगितले की तो निवृत्तीच्या निर्णयाबद्दल अजूनही माझ्या मनात गोंधळ आहे. तो म्हणाला, 'मी अजूनही या निर्णयाबद्दल थोडा संभ्रम आहे. ते माझ्या हातात नव्हते. त्यांनी मला संघातून काढून टाकण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्यावेळी मला खूप दुःख झाले होते. त्याने पुढे सांगितले की, शेवटचा कसोटी सामना खेळण्याआधी त्याने पुढील दीड वर्ष कसोटी क्रिकेट खेळण्याची तयारी केली होती. त्याच्या मनात निवृत्तीचा कोणताही विचार नव्हता आणि तो अजूनही खेळण्यासाठी उत्सुक होता.
मे 2024 मध्ये इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी अँडरसनला निवृत्ती घेण्यास सांगितले होते असे वृत्त आले होते. द गार्डियनच्या मते, मॅक्युलमने युकेमधील एका गोल्फ टूर दरम्यान अँडरसनला भेटले आणि संघाचे भविष्य लक्षात घेऊन निवृत्तीचा सल्ला दिला होता.
अँडरसनची शानदार कारकीर्द
जेम्स अँडरसनने त्याच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. 186 कसोटी सामने खेळून तो सचिननंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कसोटी खेळाडू आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. पण, हा खेळाडू आता ज्या प्रकारचा दावा करत आहे तो खरोखरच आश्चर्यकारक आहे. जर इंग्लंड क्रिकेट संघाने त्याच्यासोबत असे केले असेल तर ते निराशाजनक आहे.