एक्स्प्लोर

Pakistan T20 World Cup Super-8 Scenario : भारताने हरवलं, पण नशिबाची साथ; पाकिस्तान अजूनही सुपर-8 मध्ये पोहोचू शकतो, कसं? जाणून घ्या समीकरण

Pakistan T20 World Cup Super-8 Scenario : भारताविरुद्ध 61 धावांनी झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचे संकट ओढवले आहे.

Pakistan T20 World Cup Super-8 Scenario : भारताविरुद्ध 61 धावांनी झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचे संकट ओढवले आहे. ग्रुप A च्या गुणतालिकेत पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर घसरला असून सुपर आठमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आता पुढील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अनिवार्य झाले आहे. दुसरीकडे भारताने सलग तीन विजयांसह सहा गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले असून सुपर आठमध्ये धडक मारली आहे. विशेष म्हणजे भारताचा अजून एक सामना बाकी आहे.

भारताचा पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध दमदार खेळ करत 61 धावांनी विजय मिळवला. ईशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 20 षटकांत 7 बाद 175 धावा केल्या. प्रत्युत्तर पाकिस्तानचा डाव अवघ्या 18 षटकांत 114 धावांवर आटोपला. हा विजय भारताचा पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामन्यांमधील धावांच्या फरकाने सर्वात मोठा ठरला. याआधी 2012 मधील 11 धावांच्या विजयाचा विक्रम होता, तब्बल 14 वर्षांनंतर टीम इंडियाने तो विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला.

भारताने हरवलं, पण नशिबाची साथ

पाकिस्तानचा पराभव इतका मोठा होता की नेट रनरेटवर त्यांना फटका बसला आणि ते अमेरिकेपेक्षा खाली घसरले. पाकिस्तान 3 सामने, 2 विजय, 1 पराभव, 4 गुणांसह तिसऱ्या स्थान गेले. तर अमेरिका 4 सामने, 2 विजय, 2 पराभव, 4 गुणांसह दुसऱ्या स्थान आहेत  सुपर आठमध्ये स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला नामिबियाविरुद्धचा शेवटचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे.

नामिबिया रचणार इतिहास?

  • पाकिस्तानचा अंतिम सामना 18 फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध होणार आहे. त्याच दिवशी भारत आणि नेदरलँड्स आमनेसामने येणार आहेत.
  • सध्याच्या समीकरणानुसार ग्रुप A मधून भारतासोबत सुपर आठमध्ये पोहोचणारी दुसरी टीम अमेरिका किंवा पाकिस्तान यांपैकी एक असेल.
  • पाकिस्तान जिंकला तर त्यांचे 6 गुण होतील आणि अमेरिका बाहेर पडेल.
  • पाकिस्तान हरला तर तो 4 गुणांवरच थांबेल आणि त्यांचा प्रवास ग्रुप टप्प्यातच संपेल.
  • सामना पावसामुळे रद्द झाल्यासही पाकिस्तान पुढील फेरीत जाऊ शकतो.
  • नेदरलँड्स जिंकले तर त्यांचेही 4 गुण होतील, त्यामुळे नेट रनरेट निर्णायक ठरेल. 

हे ही वाचा -

Suryakumar Yadav Ind vs Pak : सूर्याच्या फक्त 3 शब्दांच्या पोस्टचा धुरळा! पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय लिहिलंय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 5th T20 : गंभीर-अय्यरच्या नावावर 0-4च्या पराभवाचा लाजिरवाणा कलंक! आयर्लंडनंतर इंग्रजांकडून टीम इंडियाची अब्रू वेशीला
गंभीर-अय्यरच्या नावावर 0-4च्या पराभवाचा लाजिरवाणा कलंक! आयर्लंडनंतर इंग्रजांकडून टीम इंडियाची अब्रू वेशीला
Ind vs Eng 5th T20 : इंग्लंडचा पुन्हा मोठा विजय! पाचव्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचा 56 धावांनी पराभव
इंग्लंडचा पुन्हा मोठा विजय! पाचव्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचा 56 धावांनी पराभव
Eng vs Ind 5th T20 : चुकीचे निर्णय, सुमार फिल्डिंग; इंग्रजांनी पुन्हा टीम इंडियाची लाज काढली, इंग्लंडने 257 धावा ठोकत इतिहास-भूगोल बदलला
चुकीचे निर्णय, सुमार फिल्डिंग; इंग्रजांनी पुन्हा टीम इंडियाची लाज काढली, इंग्लंडने 257 धावा ठोकत इतिहास-भूगोल बदलला
Suryakumar Yadav News : हातात बाळ, अंगात 'तो' टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?
हातात बाळ, अंगात 'तो' टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget