एक्स्प्लोर

Suryakumar Yadav Ind vs Pak : सूर्याच्या फक्त 3 शब्दांच्या पोस्टचा धुरळा! पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय लिहिलंय?

Suryakumar Yadav India vs Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत शानदार विजय नोंदवला.

Suryakumar Yadav India vs Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत शानदार विजय नोंदवला. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव करत स्पर्धेतील विजयाची मालिका कायम ठेवली. सामन्यानंतर चाहत्यांकडून जल्लोष सुरू असतानाच कर्णधार सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडियावरील पोस्टने विशेष लक्ष वेधले.

कर्णधाराची पोस्ट चर्चेत (Suryakumar Yadav Instagram Post Viral)

सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर संघासोबतचे काही फोटो शेअर केले. त्या फोटोला त्याने फक्त 3 शब्दांचा कॅप्शन दिला, ‘हर हर महादेव’. या पोस्टनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. अनेक चाहत्यांनी संघाच्या रणनीतीचे कौतुक केले, तर काहींनी या विजयाचा आनंद उत्साहात व्यक्त केला.

पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी धावसंख्या

प्रथम फलंदाजी करताना भारताने टी-20 विश्वचषकांच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी धावसंख्या उभारली. ईशान किशन याने 77 धावांची दमदार खेळी साकारत डाव सावरला. मधल्या फळीत तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांनी वेगाने धावा जमवत संघाचा स्कोर 175 पर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.

गोलंदाजांचा कहर

175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातच डळमळीत झाली. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीच्या षटकांतच तीन महत्त्वाच्या विकेट घेत पाकिस्तानला जबर धक्का दिला. सतत पडणाऱ्या विकेट्समुळे पाकिस्तानचा डाव सावरू शकला नाही आणि अखेर संपूर्ण संघ 114 धावांवर गुंडाळला गेला.

कर्णधाराचे वक्तव्य

सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाले की, या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला. त्याच्या मते, या विकेटवर 155 धावाही स्पर्धात्मक ठरल्या असत्या, मात्र 175 धावा करून संघाने स्पष्ट आघाडी मिळवली. 

ईशान किशनच्या खेळीचे त्याने विशेष कौतुक करत सांगितले की, सुरुवातीचे विकेट पडल्यावर जबाबदारी घेणारा फलंदाज आवश्यक होता आणि ईशानने ती भूमिका उत्कृष्टरीत्या निभावली. या विजयासह भारताने सुपर-8 फेरीतील आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे. आता सर्वांचे लक्ष पुढील सामन्याकडे लागले आहे.

हे ही वाचा -  

IND vs PAK Shahid Afridi on Pakistan Team : भारताकडून लाजिरवाणा पराभव; शाहिद आफ्रिदीचा संताप, जावयालाही नको नको बोललो, पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Airstrike In Afghanistan Kabul : रमजान महिन्यात मृत्यूचा तांडव, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा संताप; म्हणाले, पाकिस्तान अन् इस्रायलमध्ये कोणताही फरक नाही...
रमजान महिन्यात मृत्यूचा तांडव, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा संताप; म्हणाले, पाकिस्तान अन् इस्रायलमध्ये कोणताही फरक नाही...
SRH IPL 2026 Team Playing XI: 20 षटकांत 300 धावा करण्याची ताकद; हैदराबादचा चक्रावणारा Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
20 षटकांत 300 धावा करण्याची ताकद;हैदराबादचा चक्रावणारा Squad, IPL 2026साठी अशी असेल Playing XI
Mumbai Indians IPL 2026 : रोहित, सूर्या, पांड्या अन्.... आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अशी असणार मुंबई इंडियन्सची तगडी Playing 11
रोहित, सूर्या, पांड्या अन्.... आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अशी असणार मुंबई इंडियन्सची तगडी Playing 11
Gautam Gambhir on MS Dhoni VIDEO : MS धोनी टीम इंडियाचा कोच व्हावा, गौतम गंभीरची इच्छा; म्हणाला, मला 'माही'ला डगआऊटमध्ये बसलेला...
MS धोनी टीम इंडियाचा कोच व्हावा, गौतम गंभीरची इच्छा; म्हणाला, मला 'माही'ला डगआऊटमध्ये बसलेला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG गॅस तुटवड्याची झळ थेट बॉलिवूडपर्यंत; खिलाडी कुमार अन् ट्विंकलची धडधड वाढली, शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय म्हणाला...
LPG गॅस तुटवड्याची झळ पोहोचली बॉलिवूडपर्यंत! अक्षय कुमार अन् ट्विंकलने शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय थेटच म्हणाला...
Weather Update: राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Embed widget