Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील टी-20 सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 297 धावांची विक्रमी खेळी केली. त्यामध्ये, टीम इंडियाने तब्बल 22 षटकारांचा पाऊस पाडलाय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदसऱ्यादिवशीच्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी हैदराबादच्या स्टेडियममध्ये धुमाकूळ घातला .
संजू सॅमसनने अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावले, जे टी-20 सामन्याच्या फॉरमॅटमधील भारताचे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. सॅमसनने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत दुसऱ्या विकेटसाठी 173 धावांची भागीदारी केली.
सॅमसन 47 चेंडूंत 11 चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 111 धावा करून बाद झाला,तर सूर्यकुमार 35 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 75 धावा करून बाद झाला
हार्दिकने 18 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या.
रायनने 13 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. रिंकू सिंग चार चेंडूत एका षटकाराच्या मदतीने आठ धावा करून नाबाद माघारी परतला.
भारतीय धुरंदर फलंदाजाच्या आजच्या वादळी खेळीने भारताने 20 षटकांत तब्बल 297 धावांचा डोंगर रचला असून विक्रमी धावसंख्या बनवली आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवरील प्रेक्षकांसाठी आजचा सामना म्हणजे पैसा वसुल असाच ठरला आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात भारताना विजय निश्चित झाला आहे.