Highest run-scorers at T20 World Cup : टी20 विश्वचषकाचं नववं पर्व 2 जूनपासून सुरु होणार आहे. पहिल्यांदाच विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत, त्याशिवाय यंदाचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. 20 संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले. विश्वचषकामध्ये आता अनेक रेकॉर्ड मोडले जातील, अन् नवे विक्रमही होती. क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्येही विराट कोहलीचा जलवा असल्याचं आकड्यावरुन दिसतेय. टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. 

टी20 विश्वचषकात विराट कोहलीच किंग - 

2007 मध्ये टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली, पहिल्या विश्वचषकावर टीम इंडियाने नाव कोरले. त्या संघाचा विराट कोहली सदस्य नव्हता. पण विराट कोहलीच्या नावावर टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा आहेत. टॉप 5 मध्ये आशियातील खेळाडूंचा दबदबा दिसत आहे. ख्रिस गेल हा एकमेव आशियातील बाहेरचा खेळाडू टॉप 5 मध्ये आहे.

पाहा टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 खेळाडू -

खेळाडू वर्ष देश एकूण धावा
विराट कोहली 2012-2022 इंडिया 1141
महेला जयवर्धने 2007-2014 श्रीलंका 1016
ख्रिस गेल 2007-2021 वेस्टइंडीज 965
रोहित शर्मा 2007-2022 इंडिया 963
तिलकरत्ने दिलशान 2007-2016 श्रीलंका 897

 विराट कोहली : 

टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने 27 सामन्यातील 25 डावात फलंदाजी केली. विराट कोहलीने 131 च्या स्ट्राईक रेटने 25 डावात 1141 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणजे, प्रत्योक दुसऱ्या डावाला विराट कोहलीच्या बॅटमधून अर्धशतक येते. टी20 विश्वचषकात विराट कोहलीच्या नावावर 28 षटकार आणि 103 चौकारांची नोंद आहे. टी20 मध्ये विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 89 इतकी आहे. 

महेला जयवर्धने : 

महेला जयवर्धने अखेरचा टी20 विश्वचषकात 2014 मध्ये खेळला.जयवर्धने यानं 2007 ते 2014 यादरम्यान 31 सामने खेळले, त्यामध्ये त्याने 1016 धावा काढल्या. त्याने एक शतक आणि सहा अर्धशतके ठोकली आहेत. टी20 विश्वचषकात सर्वाधिक चौकारांचा विक्रम जयवर्धने याच्याच नावावर आहे. त्याने 111 चौकार ठोकले आहेत.  

ख्रिस गेल :

युनिवर्स बॉस ख्रिस गेल टी2 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने 31 डावात 965 धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके आणि 7 अर्धशतके ठोकली आहेत. टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम गेलच्या नावावर आहे, त्याने 63 षटकार ठोकले आहेत. 

रोहित शर्मा : 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी 20 विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. रोहित शर्माने 39 सामने खेळले आहे. त्यामधील 36 जावात त्याने 963 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 79 इतकी आहे.  रोहित शर्माने 128 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने 91 चौकार आणि 35 षटकार ठोकलेत. 

तिलकरत्ने दिलशान :

2007 ते 2016 यादरम्यान तिलकरत्ने दिलशान याने  टी20 वर्ल्ड कपमध्ये 35 सामने खेळलेत. यातील 34 डावात त्याने 124.06 च्या स्ट्राइक रेटने 897 धावा केल्या आहेत. त्याने 101 चौकार आणि 20 षटकार ठोकलेत.