Rinku Singh On ICC T-20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा (ICC T-20 World Cup 2024) 2 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. यासाठी भारतीय संघासह इतर सर्व संघांनी सराव सुरु केला आहे. भारतीय संघात भारताचा खेळाडू रिंकू सिंहला (Rinku Singh) संधी मिळाली नाही. मात्र त्याला राखील खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
रिंकू सिंहला 15 खेळाडूंमध्ये स्थान न दिल्यानं क्रिकेटमधील अनेक आजी-माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. आता स्वत: रिंकूने यावर प्रतिक्रिया दिली आहे. होय, जर चांगली कामगिरी करुन देखील तुमची निवड होत नसेल, तर खूप वाईट वाटतं. पण संघाच्या कॉम्बिनेशननूसार संघ निवडला गेला. त्याबद्दल जास्त विचार करुन फायदा नाही, कारण ते आपल्या हातात नाही, असं रिंकू म्हणाला. एका हिंदी वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत रिंकू सिंहने हे भाष्य केलं आहे.
रोहित शर्मा रिंकूला काय बोलला?
रिंकू पुढे म्हणाला की, संघात निवड झाली नसल्यामुळे मी थोडं नाराज होतो. पण जे झालं चांगल्यासाठी झालं. जे काही होतं, ते चांगल्यासाठी होतं, असं रिंकूने सांगितले. तसेच कर्णधार रोहित शर्माला भेटलो, तेव्हा त्याने हेच सांगितलं की, मेहनत सुरु ठेव, 2 वर्षांनंतर पुन्हा विश्वचषक आहे. जास्त विचार नको करु, असं रोहित शर्मा रिंकूला बोलल्याचे त्याने सांगितले.
आयपीएल 2024 च्या हंगामात रिंकूची कामगिरी खास नव्हती-
कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या रिंकूने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली नाही. रिंकून 168 धावा केल्या. खरंतर रिंकूला फलंदाजी करण्याची जास्त संधी मिळाली नाही. आयपीएलच्या गेल्या हंगामात रिंकूने 149.53 च्या स्ट्राइक रेटने 474 धावा केल्या होत्या. 2023 च्या आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते.
देवाने जे काही दिले त्यात आनंदी राहावे...'
रिंकू सिंगला आयपीएलच्या किंमतीबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, हे 55 लाख रुपये माझ्यासाठी खूप आहेत, मी मोठा होत असताना 5 ते 10 रुपये कसे मिळतील याचा विचार करायचो, पण आता माझा आयपीएलचा पगार 55 लाख आहे, जो माझ्या मते खूप जास्त आहे. माझा विश्वास आहे की देव जे काही देतो त्यात आनंदी राहावे. कोलकाता नाइट रायडर्सने रिंकू सिंगला अवघ्या 55 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. रिंकू सिंगची किंमत करोडोंमध्ये असावी असे क्रिकेट दिग्गज आणि चाहत्यांना वाटते.
टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज
राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
संबंधित बातम्या:
टी-20 विश्वचषक, पत्नी नताशासोबत घटस्फोटाची चर्चा; आता हार्दिक पांड्याने केली पोस्ट, काय म्हणाला?