Suresh Raina On Rohit Sharma : रांची कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच विकेटनं पराभव (IND vs ENG) करत मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतरही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघाने (Team India) जोरदार कमबॅक केले.  मालिका विजयानंतर रोहित शर्मावर (Rohit Sharma)  सर्वच स्तरावर कौतुक होतेय. यामध्ये माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याच्या नावाचाही समावेश आहे. साहेबांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर सुरेश रैनानं रोहित शर्माचं तोंडभरुन कौतुक केलेय. सुरेश रैनानं रोहित शर्माची तुलना कॅप्टन कूल एमएस  धोनी याच्यासोबत केली आहे. सुरेश रैनानं रोहित शर्माला पुढचा धोनी, असा उल्लेख केलाय. रोहित शर्मा युवा खेळाडूंना प्रोत्साहन देतोय, त्यामुळे त्यांचा खेळ अधिक प्रखर होत चालला आहे. रोहित शर्मा योग्य दिशेनं काम करतोय, असे सुरेश रैना म्हणाला. टाईम्स ऑफ इंडियानं सुरेश रैनाबाबतचं वृत्त प्रसारीत केलेय. 


तो धोनीप्रमाणे युवा खेळाडूंना संधी देतोय - सुरेश रैना 


 सुरेश रैना (Suresh Raina) म्हणाला की,  रोहित शर्मा पुढचा धोनी आहे. त्यानं आतापर्यंत चांगले काम केलेय. रोहित शर्मा धोनीप्रमाणे युवा खेळाडूंना अनेक संधी देत आहे. मी धोनीच्या नेतृत्वात खूप क्रिकेट खेळलोय. सौरव गांगुली यानं आपल्या संघातील खेळाडूंना खूप सपोर्ट केला. त्यानंतर धोनी आळा, त्यानं यशस्वी नेतृत्व केले. त्यानंतर आता रोहित शर्मा त्याच पद्धतीने नेतृत्व सांभाळत आहे. रोहित शर्मा योग्य दिशेने जातोय, तो एक शानदार कर्णधार आहे.


रोहित शर्माचं तोंडभरुन कौतुक -


रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळाडूंना रोटेट करतो, जे मागील काही वर्षांत मी पाहिले नव्हते. मागील काही वर्षांत टीम इंडियामध्ये अनेक वेगवान गोलंदाज आहे. आपण गोलंदाजांना दुखापत झालेल्याही पाहिल्या. पण रोहित शर्मानं सर्व योग्यरित्या मॅनेज केलेय. याआधी आपल्याकडे एक वेगवान गोलंदाज आणि तीन चार फिरकी गोलंदाज असायचे. पण आता आपण दोन वेगवान गोलंदाजासह खेळतोय. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यासारख्या दर्जेदार गोलंदाजासह आपण मैदानात उतरतोय. तरीही बुमराहला रेस्ट दिलाय. रोहित शर्मा वर्कलोड व्यवस्थित मॅनेज करतोय, असे सुरेश रैना म्हणाला. 






आणखी वाचा :


IND vs ENG Test : धर्मशालाच्या मैदानात भारताचा रेकॉर्ड कसाय? जाणून घ्या सविस्तर


IND vs ENG : रजत पाटीदारचा पत्ता होणार कट, धर्मशाला कसोटीत स्टार फलंदाजाला मिळणार संधी!


6,6,6,6,6,6,6,6  अवघ्या 33 चेंडूत शतक, रोहित शर्माचा विक्रम मोडला! 


केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाप, सारानं दिला गोंडस मुलीला जन्म!


IND vs ENG : आर. अश्विन आणि जॉनी बेयरस्टो धर्मशाला कसोटीत शतक निश्चित, मैदानात उतरताच रचणार इतिहास! 


केएल राहुल लंडनमध्ये, धर्मशाला कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह!


धोनीच्या रेल्वेतील पहिल्या नोकरीचं अपॉईंटमेट लेटर व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?


BCCI च्या तंबीनंतर आली जाग, ईशान किशन मैदानावर परतला, पण पहिल्याच सामन्यात फ्लॉप


33 चौकार, 12 षटकार, IPL आधी चेन्नईच्या खेळाडूनं ठोकलं त्रिशतक


BCCI नं फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरला शाहणपण, मुंबई संघाकडून खेळणार!