(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs Australia Womens Semifinal : टीम इंडियाला दुहेरी धक्का; कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतून बाहेर?
India vs Australia Womens Semifinal : मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर आजारी आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्या खेळू शकतील की नाही याबाबत शंका आहे.
India vs Australia Womens Semifinal : महिला टी-20 विश्वचषकाच्या (Womens T20 World Cup) उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि अष्टपैलू पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) आजारी आहेत आणि या दोन खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतील की, नाही याबाबत शंका वर्तवली जात आहे.
ICC महिला T20 विश्वचषकाचा आठवा सीझन दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला आहे. भारतीय संघाने जबरदस्त खेळ दाखवत उपांत्य फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. गुरुवारी, 23 फेब्रुवारीला संध्याकाळी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या उपांत्य फेरीत प्रवेश करायचा आहे. या सामन्यापूर्वी मिळालेल्या वृत्तानुसार, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि गोलंदाज पूजा वस्त्राकर यांची प्रकृती बिघडली आहे. या दोघांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्यावर शंका आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, सामन्याच्या एक दिवस आधी हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांची प्रकृती खालावली होती. दोघांनाही केपटाऊनजवळच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. या दोघींना जरी डिस्चार्ज देण्यात आला असला तरी त्या अजून पूर्णपणे फिट नाहीयेत. त्यामुळे त्या दोघीही आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे.
संघाची जबाबदारी उपकर्णधार स्मृती मंधना सांभाळण्याची शक्यता
हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत संघाची उपकर्णधार स्मृती मंधना (Smriti Mandhana) जबाबदारी सांभाळणार अशी शक्यता आहे. कर्णधाराच्या जागी हरलीन देओलला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. तसेच, या सामन्यापूर्वी राधा यादवची प्रकृतीही बिघडली होती आणि तिला बाहेर बसावे लागले होते. पूजाच्या जागी वेगवान गोलंदाज अंजली सरवानीला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली जाऊ शकते. ICC टेक्निकल कमिटीने पूजाच्या जागी स्नेह राणाची बदली खेळाडू म्हणून खेळण्यास परवानगी दिली आहे.
JUST IN - India pacer ruled out of crunch #T20WorldCup semi-final against Australia due to illness.#AUSvIND | #TurnItUp
— ICC (@ICC) February 23, 2023
एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 171 धावा
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने 2017 एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 171 धावांची संस्मरणीय नाबाद खेळी खेळली. 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकार मारत ही अतुलनीय खेळी खेळली. भारताने हा सामना 36 धावांनी जिंकून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :