Hardik Pandya Amit Shah : भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ब्रेकवर असणारा हार्दिक पांड्या नुकताच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत स्पॉट झाला. क्रिकेटच्या मैदानात अमित शाह आणि हार्दिक पांड्या यांची भेट झाली. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीही एक्स (ट्विटर) वर हार्दिक पांड्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. हार्दिक पांड्या आणि अमित शाह यांची गांधीनगरमध्ये भेट झाली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर हार्दिक पांड्या ट्रेंड करत आहेत. काही नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केलेय, तर काहींनी लाईक्स अन् कमेंट्सा वर्षाव केलाय. 


हार्दिक पांड्या आणि अमित शाह यांची भेट का ?


गुजरातची राजधानी गांधी नगरमध्ये क्रिकेट लीग स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या उपस्थित होते. त्यावेळी दोघांची भेट झाली. यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह हेही उपस्थित होते. अमित शाह यांनी या प्रसंगाचे फोटो ट्वीट केले आहेत. त्याशिवाय हार्दिक पांड्याने इन्स्ट्रग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. 






दुखापतीमुळे हार्दिक पांड्या संघाबाहेर - 


हार्दिक पांड्या 2023 विश्वचषकानंतर भारतीय संघाबाहेर आहे. विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. पुण्यात झालेल्या भारत आणि बांगलादेश सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून हार्दिक पांड्या भारतीय संघाबाहेर आहे. कमबॅक करण्यासाठी हार्दिक पांड्या कसून तयारी करत आहे. एनसीएमध्येही हार्दिक पांड्याने घाम गाळला. हार्दिक पांड्या आयपीएलद्वारे क्रिकेटच्या मैदानावर परत येण्याची शक्यता आहे. 


पांड्याचे करिअर - 


हार्दिक पांड्याने आतापर्यंत 86 वनडे, 11 कसोटी आणि 92 टी 20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय. पांड्याने वनडेमध्ये 1769 धावा केल्या आहेत.त्याशिवाय 84 विकेटही घेतल्या आहेत. कसोटीत पांड्याने 532 धावा केल्यात तर 17 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याने टी 20 मध्ये 1348 धावा चोपल्यात. त्याशिवाय 73 विकेटही घेतल्या आहेत.