IND Vs ENG : इंग्लंडविरोधात 15 फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघ (Team India) मोठ्या अडचणीत सापडलाय. अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची (Team India) फलंदाजी अतिशय कमकुवत वाटत आहे. विराट कोहली (Virat Kohli),  केएल राहुल (KL Rahul) यांच्याशिवाय भारतीय फलंदाजी अतिशय दुबळी दिसत आहे. भारताच्या अख्या फलंदाजांवर एकटा जो रुट (Joe Root) वरचढ दिसतोय. होय, इंग्लंडविरोधात मैदानात उतरणाऱ्या टीम इंडियातील सर्वात अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा वगळता शुभमन गिल याने फक्त दहापेक्षा जास्त कसोटी सामने खेळलाय. इतर फलंदाज 10 कसोटी सामनेही खेळले नाहीत. भारताच्या सगळ्या फलंदाजांनी खेळलेल्या कसोटी सामन्यापेक्षा जो रुटने खेळलेले सामने जास्त आहेत. त्याशिवाय धावांही जो रुट याच्या जास्त आहेत. 


दुखापतीमुळे केएल राहुल तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये सरफराज खान अथवा देवदत्त पड्डीकल पदार्पण करण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण असेल? याबाबत लवकरच समोर येईल. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा, यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान, रजत पाटीदार, धघ्रुव जुरेल/केएस भरत यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. यामध्ये रोहित शर्माने 56 कसोटी सामने खेळले आहेत. तर शुभमन गिल 22 कसोटी सामन्यासह दुसरा अनुभवी फलंदाज आहे. तिसऱ्या क्रमांकावर केएस भरत आहे, त्याने 07 सामने खेळले आहेत. तिसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. यशस्वी जायस्वाल सहा कसोटी सामने खेळलाय. तर रजत पाटीदार याने नुकतेच पदार्पण केलेय. सरफराज खान अथवा ध्रुव जुरेल यांनी अद्याप पदार्पण केले नाही.


 इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट याने आतापर्यंत 137 कसोटी सामने खेळले आहेत. भारताच्या सगळ्या फलंदाजांनी 98 कसोटी सामने खेळले आहेत. म्हणजेच, भारताच्या अख्ख्या फलंदाजांवर एकटा रुट भारी पडतोय. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत भारताची सर्वात मोठी अडचण विराट कोहली नसणं ही होय. विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. विराट कोहलीकडे 100 पेक्षा जास्त कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय केएल राहुलही दुखापतीमुळे खेळत नाही. राहुल 50 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलाय. विराट कोहली आणि राहुलच्या अनुपस्थित भारताची फलंदाजी कमकुवत जाणवत आहे. अशा स्थितीमध्ये रोहित शर्मा याच्यावर मोठी भिस्त असेल.


टीम इंडिया Vs इंग्लंड टेस्ट सीरीजचं शेड्यूल 


1st टेस्ट : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजय) 
2nd टेस्ट : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम (टीम इंडियाचा 106 धावांनी विजय) 
3rd टेस्ट : 15-19 फेब्रुवारी, राजकोट 
4th टेस्ट : 23-27 फेब्रुवारी, रांची 
5th टेस्ट : 7-11 मार्च, धर्मशाला


आणखी वाचा :


KL राहुल तिसऱ्या कसोटीतून बाहेर, देवदत्त पड्डीकलला संधी