Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) स्पर्धेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियासाठी (Team India) खूप महत्त्वाचा ठरला. हार्दिक पांड्याने जेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियासाठी शेवटचे षटक टाकले. हार्दिक पांड्या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना दिसला. हार्दिक पांड्याने फलंदाजीत 6 डावात 144 धावा केल्या आणि गोलंदाजीत 11 विकेट्स घेतल्या. आता हार्दिक पांड्या मायदेशी परतल्यानंतर पुन्हा एकदा त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून (Natasha Stankovic) घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.


29 जून रोजी टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर, टीम इंडिया तेथील वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती. त्यानंतर गुरुवारी, 4 जुलै रोजी टीम इंडिया भारतात दाखल झाली. मायदेशी परतल्यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी मुंबईतील मरीन ड्राइव्ह विजयी रॅली काढण्यात आली. यानंतर सर्व क्रिकेटपटू आपापल्या घरी परतले. सर्व क्रिकेटपटूंचे त्यांच्या कुटुंबीयांनी घरी स्वागत केले, परंतु हार्दिक पांड्यासोबत असे घडले नाही. 


हार्दिक पांड्याने आपला मुलगा अगस्त्यसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये हार्दिकने आपल्या मुलाला जिंकलेले मेडलही दिले. या फोटोंमध्ये हार्दिकची पत्नी नताशा स्टोनकोविक कुठेच दिसली नाही. 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी आयपीएलदरम्यान हार्दिक आणि नताशा यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्यांनी बरेच लक्ष वेधले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. हार्दिकच्या या फोटोवर नताशाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या. एका यूजरने लिहिले की, "काहीतरी गडबड आहे, नताशा दिसत नाही." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "भाऊ, घटस्फोटाची बातमी खरी आहे का?"






नताशाची एकही पोस्ट नाही-


नताशाने हार्दिकसाठी विश्वचषक जिंकल्याची कोणतीही पोस्ट केलेली नाही. या विजयावर नताशाच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी, हार्दिकच्या मेहुण्याने, म्हणजेच मोठा भाऊ कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने भारताच्या विजयानंतर हार्दिकसाठी एक भावनिक पोस्ट केली होती. पोस्ट शेअर करत हार्दिकने पंखुरी शर्माला आपला आधारस्तंभ असं म्हटलं आहे.






अंतिम सामन्यानंतर हार्दिक सर्व बोलून गेला-


अंतिम सामन्यातील विजयानंतर हार्दिक पांड्या अत्यंत भावूक झाला. त्यानंतर हार्दिकने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याने म्हटले की, हा विजय खूप काही आहे. आम्ही खूप भावूक झालो आहोत, आम्ही मेहनत करत होतो पण काहीतरी राहून जात होते. पण आज संपूर्ण देशाला जे हवे ते आम्ही करुन दाखवले. गेल्या सहा महिन्यांचा काळ पाहता हा विजय विशेषत: माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्यासोबत काही गोष्टी अयोग्य घडल्या होत्या. मी त्या काळात एकही शब्द बोललो नव्हतो. पण मला माहिती होतं की, मी सातत्याने मेहनत करत राहिलो तर मी झळाळून निघेने आणि मला हवं ते साध्य करेन. त्यासाठी अशी संधी मिळणे हे अधिक विशेष आहे, असे हार्दिक पांड्याने म्हटले.


हार्दिक पांड्या किती कमावतो?


हार्दिक पांड्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याला संघाकडून फी म्हणून 15 कोटी रुपये मिळतात. यापूर्वी तो गुजरात टायटन्सचा भाग होता. गुजरातचा संघही पांड्याला तेवढीच रक्कम द्यायचा. यासोबतच त्याला भारतीय क्रिकेट संघाकडून मॅच फी देखील मिळते. पांड्याची कमाई करोडोंमध्ये आहे. 


वडोदरा आणि मुंबईत करोडोंची घरं-


हार्दिक पांड्याने मुंबईत एक अपार्टमेंट घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी हे घर 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यासोबतच त्यांचे वडोदरा येथे पेंटहाऊस आहे. त्याची किंमतही करोडोंमध्ये आहे. हार्दिक पांड्या विविध ब्रँडच्या जाहिरातींमधून सुमारे 55-60 लाख रुपये कमावतो. हार्दिकने Halaplay, Gulf Oil, Star Sports, Gillette, Jaggle, Sin Denim, D:FY, Boat, Oppo, Dream11, Reliance Retail, Villain आणि SG क्रिकेटला मान्यता दिली आहे.


संबंधित बातम्या:


1983, 2007, 2011 साली विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाला BCCI कडून किती रुपये मिळाले?, पाहा A टू Z माहिती


125 Crore Prize Money Distribution: भारतीय संघामध्ये 125 कोटी रुपयांचे वाटप कसे होणार?; टॅक्स किती कापणार?, जाणून घ्या!