Hardik Pandya On His Bad And Difficult Time न्यूयॉर्क : हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) टी20 वर्ल्ड कप 2024  (T 20 World Cup)पूर्वी बांगलादेश विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात दमदार फलंदाजी केली. हार्दिक पांड्या बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला. हार्दिकनं 23 बॉलमध्ये 2 चौकार आणि 4 षटकार मारत 40 धावा केल्या. आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये दिसणाऱ्या हार्दिकनं बांगलादेश विरुद्धच्या लढतीत दमदार फलंदाजी केली.  


हार्दिक पांड्याला सध्या त्याच्या खासगी जीवनात आणि प्रोफेशनल करिअरमध्ये वाईट स्थितीचा सामना करावा लागला. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सनं कॅप्टन केलं होतं. हार्दिक पांड्या कॅप्टन आणि खेळाडू म्हणून फ्लॉप ठरला होता. मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये दहाव्या स्थानावर राहिली होती. हार्दिकला आयपीएलमध्ये 13 डावात फलंदाजी करताना 216 धावा केल्या होत्या. तर, हार्दिकनं बॉलिंग करताना 10.75 च्या इकोनॉमीनं 11 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये खराब कामगिरी झालेली असतानाच हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर आल्या.  


हार्दिक पांड्यानं स्टार स्पोर्टससोबत पोलताना म्हटलं की, "मी यापासून दूर पळून जाणार नाही लढत राहणार, मला वाटत की तुम्हाला लढत राहावं लागेल. काही काही वेळा आयुष्य तुम्हाला अशा परिस्थितीत आणतं की जिथं गोष्टी खडतर असतात. मात्र, मला असं वाटतं की तुम्ही मैदान किंवा खेळ सोडून देता तेव्हा तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते मिळत नाही किंवा तुम्ही ज्याचा शोध घेत असता, ते देखील मिळत नाही", असं हार्दिक पांड्यानं म्हटलं. 
 
हार्दिक पांड्यानं पुढं म्हटलं की,"हे सर्व अवघड ठरत असलं तरी मी प्रोसेसच्या सोबत जात आहे. मी ज्या गोष्टींना यापूर्वी फॉलो करत आहे त्यासोबत जात आहे. चांगला किंवा वाईट काळ असतो, हे टप्पे येत आणि जात असतात, हे ठीक आहे. मी अशा प्रकारच्या काळातून अनेकदा गेलो आहे आणि यातून बाहेर देखील आलो आहे, असं हार्दिक पांड्यानं म्हटलं.  


टी 20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियाचा उपकॅप्टन करण्यात आल्याबद्दल विचारलं असता हार्दिक पांड्यानं मी यशाला फारसं गांभीर्यानं घेत नसल्याचं म्हटलं. मी जे चांगलं केलं आहे ते लवकर विसरुन जातो आणि पुढं जातो.  वाईट काळात देखील असचं करतो, मला वाटतं की हा वाईट काळ देखील निघून जाईल. तुम्ही खेळत राहा, तुमचं कौशल्य सुधारत आहे याचा स्वीकार करा, कठोर मेहनत करत राहा, ती कधी वाया जात नाही आणि हसत राहा, असं हार्दिक पांड्यानं म्हटलं.  


संबंधित बातम्या :