England Beat India in 3rd T20I Rajkot : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने हार्दिक पांड्यावर निशाणा साधला. पार्थिवच्या म्हणण्यांनुसार, हार्दिकने खूप डॉट बॉल खेळले ज्यामुळे टिम इंडियाला हरली.
धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. त्याने 35 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. हार्दिकच्या या खेळीबद्दल पार्थिव पटेल म्हणाला की, सुरुवातीला त्याने खूप डॉट बॉल खेळले. पटेल म्हणाला की, टी-20 सामन्यात सेट होण्यासाठी खेळाडू 20-25 चेंडू खेळू शकत नाही.
स्टार स्पोर्ट्सवरील सामन्यानंतर बोलताना पार्थिव पटेल म्हणाला, "तुम्ही सेट होण्यासाठी 20-25 चेंडू घेऊ शकत नाही. तुमचा वेळ घेणे मला समजते पण तुम्ही स्ट्राईक फिरवत राहावे. हार्दिकने कदाचित 35 चेंडूत 40 धावा केल्या असतील पण त्याने डावाच्या सुरुवातीला बरेच डॉट बॉल खेळले." धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने 9 ते 16 षटकांमध्ये फक्त 40 धावा जोडल्या, जे पराभवाचे एक प्रमुख कारण ठरले. संघाने सतत विकेट गमावल्या. भारताला सामना जिंकण्यास मदत करणारी कोणतीही मोठी भागीदारी करता आली नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाने 20 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या. यादरम्यान, बेन डकेटने संघासाठी शानदार खेळी केली आणि 28 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडिया धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली पण संघाला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ 145 धावा करता आला. अशाप्रकारे, इंग्लंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात यश मिळवले. आता, दोन्ही संघ शुक्रवारी (31 जानेवारी) पुण्यात पुन्हा एकदा एकमेकांसमोर येतील जिथे टीम इंडिया मालिकेत अजिंक्य आघाडी मिळविण्याचे ध्येय ठेवेल.
हे ही वाचा -