Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या (Hardik Pandya Divorce) चर्चेला नवं वळण मिळाले आहे. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीनं हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात सर्वकाही ठीक नाही, त्यांचं बिनसलेय. मागील अनेक महिन्यापासून ते दोघेही वेगळे राहत आहेत. घटस्फोटाबाबत दोघांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण अफवांचा बाजार उठला आहे. त्यांच्या घटस्फोटच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहे. नताशाने आपल्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलमधून हार्दिक पांड्याचं नाव आणि फोटो हटवल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चेला वेग आला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचे जुने व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मित्राचा मोठा खुलासा -
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या जवळच्या मित्राने प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासा केलाय. तो म्हणाला की, "हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक मागील अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरु आहेत. नताशा हार्दिकसोबत राहत नाही. ते एकमेकांशी बोलतात की नाही? हे कोणालाच माहीत नाही. पण त्यांच्यापैकी एकजण बोलण्यासाठी नक्कीच फोन करेन अथवा उचलेल, अशीच सध्या तरी आशा आहे."
हार्दिक पांड्या-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा का ?
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचं 2020 मध्ये लग्न झाले, त्यांना सध्या एक मुलगा आहे. त्याचं नाव अगस्त्य आहे. लग्नाच्या चार वर्षानंतरच हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. नताशाने आपल्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलमधून हार्दिक पांड्या हे सरनेम हटवल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चेला वेग आला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचे काही जुने व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोरदार सुरु आहे. त्याशिवाय हार्दिक पांड्याचा मुलगा सध्या कृणाल पांड्याच्या घरी असल्याचेही समोर आलेय.
हार्दिक पांड्याची 70 टक्के प्रॉपर्टी जाणार ?
हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच आणखी एका चर्चेला उधाण आलेय. घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्याला आपल्या संपत्तीमधील 70 टक्के वाटा नताशाला द्यावा लागेल, या चर्चेला वेग आलाय. याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.