कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या (T20 Series) मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कर्णधारपदी आणि शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती. हार्दिक पांड्याचं नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत असताना निवड समिती आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमार यादवची निवड केली. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा प्रमुख सदस्य होता. हार्दिक पांड्याची उपकर्णधारपदी टी 20 वर्ल्ड कपमध्ये निवड करण्यात आली होती. वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केल्यानं हार्दिक पांड्याचं नाव रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आघाडीवर होतं. मात्र, सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्यात आलं. अखेर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. काल भारतीय संघानं गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात सराव सत्रात सहभाग घेतला. यावेळी हार्दिक पांड्या आणि अभिषेक नायर (Abhishek Nayar) यांच्यात मतभेद झाले. अखेर एका पत्रकारानं हा वाद सोडवला.
हार्दिक पांड्या आणि अभिषेक नायरमध्ये काय घडलं?
हार्दिक पांड्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यातून हार्दिक पांड्यानं माघार घेतली आहे. टी 20 मलिकेसाठी सराव सत्रात हार्दिक पांड्या सहभागी झाला होता. हार्दिक पांड्या आणि गौतम गंभीर यांनी सरावसत्रात चर्चा केली. त्यानंतर हार्दिकनं यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांना गोलंदाजी केली. हार्दिक पांड्यानं यानंतर अभिषेक नायर यांच्या निरिक्षणाखाली फलंदाजी केली. Revsportz च्या पत्रकारानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
हार्दिक पांड्यानं पॉईंटला फटका मारला होता. हार्दिकनं तो चौकार असल्याचा दावा केला. अभिषेक नायर यांनी तो चौकार नसल्याचं म्हटलं. या मुद्यावरुन हार्दिक पांड्या आणि अभिषेक नायर यांच्यामध्ये मतभेद झाले. पॉईंटवर असलेल्या पत्रकाराची मदत घेण्याचा निर्णय घेतला गेला. संबंधित पत्रकारानं चौकार असल्याचं सांगितलं अनं वादावर पडदा पडला.
27 जुलैपासून टी 20 मालिका सुरु
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन भारतात केलं जाणार आहे. या वर्ल्ड कपच्या तयारीचा भाग म्हणून पूर्णवेळ कॅप्टन भारतीय संघाला असावा या भूमिकेतून सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या कार्यकाळाची देखील सुरुवात या मालिकेपासून होणार आहे. सध्या गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात टीम इंडियाची यंग ब्रिगेड सराव सत्रात सहभागी झाली होती.सं
संबंधित बातम्या :
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न गेल्यास पाकिस्तानाला फायदा होणार; महत्वाची माहिती आली समोर