नवी दिल्ली : टीम इंडियाचा (Team India) आक्रमक वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि त्याचे मित्र उमेश कुमार (Umesh Kumar) या दोघांनी शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत उमेश कुमार यांनी मोहम्मद शमीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. मोहम्मद शमी पुढील काळात आपल्या देशाचं नाव मोठं करेल, असा विश्वास होता. समोरचा व्यक्त खरं बोलतोय का ते आपल्याला समजतं. मोहम्मद शमीनं जे सांगितलं ते खरं वाटलं त्यामुळं त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला, असं उमेश कुमार म्हणाले. पाकिस्तानसोबत मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता त्यावेळी तो कोलमडून गेला होता, असं उमेश कुमार यांनी म्हटलं. 


मोहमम्द शमीच्या जीवनात ते 30 दिवस संघर्षाचे होते. कोलकाता येथे तक्रार झाल्यानंतरचे 30 दिवस संघर्षाचे होते. मोहम्मद शमीच्या जागी दुसरा कोणी असता तर संपला असता, पुन्हा क्रिकेट खेळू शकला नसता, असं उमेश कुमार म्हणाले. जेव्हा शमी माझ्यासोबत होता तेव्हा तो माझ्या घरी वास्तव्याला होता. तो सर्व गोष्टींशी लढत होता.  मात्र, ज्यावेळी पाकिस्तानसोबत फिक्सिंगचा आरोप लागला आणि चौकशी सुरु झाली तेव्हा तो कोलमडून गेला होता, असं उमेश कुमार म्हणाले. 


मोहम्मद शमी जीवन संपवणार होता...


इमारतीच्या 19 व्या मजल्यावर राहतो. मोहम्मद शमी माझ्यासोबत मुक्कामाला होता. पहाटेचे चार वाजलेले, माझ्याकडील बाटलीतील पाणी संपलं होतं. त्यावेळी पाहिलं तेव्हा तो गॅलरीत होता, त्यावेळी शमीच्या मनात काय चाललेलं होतं हे मला समजलं होतं. मोहम्मद शमीच्या आयुष्यातील सर्वात संघर्षाची रात्र होती. शमी त्या रात्री म्हणाला होता की, मला मारा, शिक्षा करा, फाशी द्या, मी सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे. मात्र, पाकिस्तानसोबतच्या फिक्सिंगचा आरोप सहन करण्यापलीकडील आहे. यावर शमीला सांगितलं की जीवनात कोणत्या गोष्टी थांबत नाहीत, जीवन चालत राहतं, असं उमेश कुमार म्हणाले. 


एका दुपारी मेसेज आला, मोहम्मद शमीला क्लीन चीट दिली होती. पोलीस अधिकारी नीरज यांनी त्याला क्लीन चीट दिली होती. तो दिवस शमीच्या आयुष्यातील वर्ल्ड कप जिंकण्यापेक्षा मोठा दिवस होत, असं उमेश कुमार म्हणाले.  मोहम्मद शमी सध्या जगातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक गोलंदाज असल्याचं उमेश कुमार म्हणाले. 


दरम्यान, मोहम्मद शमी आता दुखापतीतून सावरत असून भारताच्या बांगलादेश दौऱ्यापासून संघात कमबॅक करु शकतो. 2023 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीनं दमदार कामगिरी केली होती. 


संबंदित बातम्या :


सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्यात वादाची ठिणगी?; संशायाची पाल चुकचुकली, श्रीलंकेत काय घडलं?


टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न गेल्यास पाकिस्तानाला फायदा होणार; महत्वाची माहिती आली समोर