IND vs SA: विमानातचं हार्दिक-कार्तिकनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बनवलेला प्लॅन, सामन्यानंतर दिली माहिती
IND vs SA: राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium) खेळण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतानं 82 धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं.
IND vs SA: राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium) खेळण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतानं 82 धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. दरम्यान, चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) दमदार कामगिरी केली. भारतानं फक्त 81 धावांवर चार विकेट्स गमावले असताना हार्दिक आणि कार्तिकनं आक्रमक फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दबाव निर्माण झाला. या सामन्यानंतर बीसीसीआयनं हार्दिक आणि कार्तिकच्या संभाषणाचा व्हिडिओ शेअर केलाय. दोघांनी विमानतच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लॅन बनवला होता, असं दिनेश कार्तिक या व्हिडिओत बोलताना दिसत आहे.
दिनेश कार्तिक काय म्हणाला?
बीसीसीआयनं शेअर केलेल्या व्हिडिओ हार्दिक पांड्यानं दिनेश कार्तिकला सामन्यातील रणनीतीबद्दल विचारलं. त्यावेळी दिनेश म्हणाला की, कदाचित तुझ्या लक्षात असेल तर, आपण विशाखापट्टम येथून राजकोटच्या दिशेनं रवाना झालो. तेव्हा विमानतच आपण चौथ्या सामन्यातील रणनीतीबद्दल बोललो. या सामन्यात धावा कशा करायच्या? मधल्या फळीतील फलंदाजासाठी कोणत्या गोलंदाजाला लक्ष्य करायचं? कुठं धावा काढायच्या हे माहित असणं खूप महत्वाचं आहे.
बीसीसीआयचं ट्वीट-
In-flight insightful conversation 👌
— BCCI (@BCCI) June 18, 2022
Learning from the great @msdhoni 👍
Being an inspiration 👏
DO NOT MISS as @hardikpandya7 & @DineshKarthik chat after #TeamIndia's win in Rajkot. 😎 😎 - By @28anand
Full interview 📽️👇 #INDvSA | @Paytmhttps://t.co/R6sPJK68Gy pic.twitter.com/wx1o9dOPNB
रणनीतीचा दिनेश कार्तिकला फायदा
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, सामन्याच्या सुरुवातीपासूनच मला या रणनीतीचा फायदा मिळाला. मला हार्दिक पांड्यासोबत फलंदाजी करायला खूप आवडतं. विकेट्सच्या दरम्यान मजा करतो. सुरुवातीला जास्त बोलत नाहीत. परंतु, विकेट्सदरम्यान खूप मस्ती करत असतो. या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर या सामन्याच्या पहिल्या 10 षटकांमध्ये फारशा धावा झाल्या नाहीत, त्यामुळे आमच्यावर दबाव होता.
हे देखील वाचा-
- IND vs SA: 'पुढच्या सामन्यात उजव्या हातानं नाणं फेकणार' चारही सामन्यात नाणेफेक गमावलेल्या ऋषभ पंतची मजेदार कमेंट!
- Avesh Khan: राजकोट टी-20 सामन्यात चार विकेट्स घेऊन आवेश खानचं वडिलांना बर्थडे गिफ्ट!
- ENG vs NED: ...अन्यथा जोस बटलर ठरला असता टी-20 चा बादशाह! थोडक्यात वाचला एबी डिव्हिलियर्सचा वर्ल्ड रेकार्ड