Harbhajan Singh Retirement : भारताचा आघाडीचा फिरकीपटू हरभजन निवृत्ती घेण्याच्या तयारीत, आयपीएल संघाच्या सपोर्ट स्टाफच्या भूमीकेत?
भारतीय क्रिकेट जगतातील एक मोठं नाव असणाऱ्या हरभजन सिंगने अद्याप निवृत्ती घेतलेली नाही. पण पुढील काही दिवसांत तो निवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : तब्बल 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये आशिया कपमध्ये भारतीय संघातून शेवटचा टी20 सामना खेळलेला दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) लवकरच निवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. 41 वर्षीय हरभजन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शेवटची आयपीएल खेळला होता. मात्र सध्यातरी त्याला संघाने रिटेन केलेले नसल्याने आता तो निवृत्ती घेण्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. तसंच हरभजन आयपीएलच्या संघात सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत दिसू शकतो असंही सांगितलं जात आहे.
तब्बल 700 हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स नावावर असलेल्या हरभजनचा फॉर्म वयानुसार अलीकडे कमी झाला आहे. त्यामुळे भारतीय संघातच नाही तर आयपीएलच्या टीममध्येही तो खेळताना दिसत नाही. त्यानंतर आता तो अधिकृत निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. आयपीएल संबधित एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, “हरभजन निवृत्ती घेऊन एका आयपीएल संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम करणार आहे. तसच लिलाव प्रक्रियेतही तो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.''
हरभजनची कारकिर्द
एक अव्वल दर्जाचा फिरकीपटू असणाऱ्या हरभजन सिंगने काही सामन्यात शेवटच्या फळीत फलंदाजीला येत काही उत्तम फटकेही लगावले आहेत. पण त्याच्या फिरकी गोलंदाजीचा जवाब नाही. हरभजनने आंतरराष्ट्रीय 103 कसोटी सामन्यात 417 विकेट्स घेतल्या आहेत. तर 236 एकदिवसीय सामन्यात 269 विकेट्स हरभजनने टिपल्या आहेत. याशिवाय 28 टी20 सामन्यांमध्ये हरभजनने 25 विकेट्स नावावर केल्या आहेत. आयपीएलचा विचार करता हरभजनने 163 सामन्याक 150 विकेट्स नावावर केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- India tour of South Africa : ठरलं! दक्षिण आफ्रिकेचा दौरा होणारच, आयसीसीकडून सुधारित वेळापत्रक जाहीर
- न्यूझीलंडला 372 धावांनी नमवूनही WTC रँकिगमध्ये भारत अव्वल नाही, पाकिस्तान-श्रीलंका क्रिकेट संघ आहे कारण
- IND vs NZ: कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा 'मालिकावीर' म्हणून चमकलेले भारतीय क्रिकेटपटू, 'या' तिघांचा आहे समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha