IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील आगामी एकदिवसीय मालिकांसह टी20 मालिकेसाठी भारताने संघ जाहीर केला आहे. यावेळी भारताचा अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) बऱ्याच काळानंतर संधी देण्यात आली. दरम्यान या निर्णयानंतर बऱ्याच चर्चांना उधाण आल असून माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने देखील याबाबत प्रतिक्रिया देत कुलदीपला काही सल्लेही दिले आहेत.


आयपीएलदरम्यान केकेआरकडून खेळताना सरावादरम्यान कुलदीपच्या गुडघ्याला दुखापत झाली, ज्यामुळे तो युएईतून थेट मुंबईत परतला आणि त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. तेव्हापासून तो विश्रांतीवर असून आता बऱ्याच काळानंतर मैदानावर परतत आहे तेही थेट आंतरराष्ट्रीय सामन्यात. त्यामुळे हरभजन याबाबत पीटीआयशी बोलताना म्हणाला,''कुलदीप यादवसाठी हे पुनरागमन काहीसं अवघड असेल. कारण दुखापतीतून सावरुन आणि विश्रांतीनंतर स्थानिक सामने न खेळता थेट आंतरराष्ट्रीय सामना खेळणं अवघड असेल. त्यामुळे यावेळी त्याला डोक्यात केवळ एकच गोष्ट ठेवावी लागेल. ती म्हणजे फलंदाज माझ्या ओव्हरमध्ये अधिक धावा करणार नाही. सध्या त्याला संयम बाळगून योग्य कामगिरी करणं गरजेचं आहे.''


वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान 


वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक 


एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद


टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha