Team India Squad: वेस्टइंडीजविरुद्ध पार पडणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. 18 सदस्यीय या संघात 8 फलंदाज, 4 फिरकीपटू, 5 वेगवान गोंलबाज आणि 1 यष्टीरक्षकाला को संधी देण्यात आली आहे. संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे तर उपकर्णधारपद केएल राहुल सांभाळणार आहे. दरम्यान या एकदिवसीय संघात दक्षिण आफ्रिकविरुद्ध संधी मिळालेल्या 5 खेळाडूंना खराब कामगिरीमुळे संधी मिळालेली नाही.


या खेळाडूंमध्ये अष्टैपैलू व्यंकटेश अय्यर, जयंत यादव, स्टार फिरकीपटू आर. अश्विन, अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि ईशान किशन यांचा समावेश आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरद्ध वनडे सीरीज 0-3 ने गमवावी लागल्यानंतर संघात हे बदल झाले आहेत. दरम्यान यात आश्विन आणि भुवनेश्वर यांनी खास कामगिरी न केल्याने ते बाहेर गेल्याचे समजून येते. परंतू इतर तिघांना नीट संधी मिळाली नसताना त्यांना संघातून बाहेर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामध्ये अय्यरला अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी देत अधिक गोलंदाजी दिली नाही, तर जयंतला एकच सामना खेळवला आणि इशानलातर संधीच मिळाली नव्हती. 


वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान 


वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक 


एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद


टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha