IND vs SA : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील एकदिवसीय मालिकेत (One Day Series) भारताने 2-0 ने आधीच पराभव मिळवला आहे. तीन पैकी दोन सामने आफ्रिकेने जिंकले आहेत. पण तिसरा सामना मात्र अजून बाकी आहे. तीनही सामने गमावून मालिका पराभूत होण्यापासून भारतीय संघाला वाचवण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजनने सिंगने (Harbhajan Singh) गोलंदाजांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.


हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, संघाला विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंवर लक्ष द्यायला हवं. फिरकीपटूंनी मधल्या ओव्हर अर्थात 15 ते 40 ओव्हरमध्ये विकेट घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे संघाला कोणते स्पिनर विकेट मिळवून देऊ शकतात यावर लक्ष द्यायला हवं. त्यामुळे आठ ओव्हरमध्ये 60 रन कि नऊ ओव्हरमध्ये 70 रन दिले यापेक्षा महत्त्वाचे विकेट घेणं अधिक गरजेचं असल्याचं हरभजन म्हणाला. 


कोहलीलाही दिला खास सल्ला


हरभजन सिंग याने दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर माजी कर्णधार विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. त्याच्या मते विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपद सोडल्यानंतर संघात स्थान मिळण्यासाठी चांगली कामगिरी करायला हवी. आधी कर्णधार असल्याने संघात स्थानाची कोणतीही चिंता नव्हती पण आता उत्तम प्रदर्शन करणं गरजेचं आहे, असं हरभजन म्हणाला. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha