IND vs WI : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेनंतर भारताने एकदिवसीय मालिकाही गमावली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर मायदेशात श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघाविरोधात टीम इंडिया दोन हात करणार आहे. भारतामध्ये वेस्ट इंडिज संघाविरोधात तीन सामन्याची एकदिवसीय आणि टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेचं सुधारित वेळापत्रक बीसीसीआयने जारी केलं आहे. सहा फ्रेबुवारीपासून वेस्ट इंडिजविरोधात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. (BCCI announces revised venues for home series against West Indies)
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजविरोधातील सामने दोन शहरात होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअम अहमदाबाद आणि इडन गार्डन कोलकाता या मैदानावर एकदिवसीय आणि टी 20 मालिका होणार आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न जाणाऱ्या रोहित शर्माचं या मालिकेद्वारे पुनरागमन होणार आहे.
वेस्ट इंडिजचा भारत दौऱ्याचं सुधारित वेळापत्रक एकदिवसीय मालिका -6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबादटी-20 मालिका15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
वेस्ट इंडिजविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघ आयपीएल, इंग्लंड दौरा, आशिया चषक, टी-20 विश्वचषक.. यासारख्या स्पर्धा खेळणार आहे. 2022 मधील भारतीय संघाच्या वेळापत्रकावर नजर मारुयात....
श्रीलंकेचा भारत दौरा - कसोटी मालिका 25 फ्रेब्रुवारी ते एक मार्च - बंगळुरु5 ते 9 मार्च - मोहाली13 मार्च - मोहाटी - 20 मालिका -
ली15 मार्च - धर्मशाला18 मार्च - लखनौ
एप्रिल - मे यादरम्यान आयपीएलचे सामने होण्याची शक्यता
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा - टी-20 मालिका - 9 जून - चेन्नई12 जून - बंगळुरु14 जून - नागपूर17 जून - राजकोट19 जून - दिल्ली
भारताचा इंग्लंड दौरा - रिशड्युल कसोटी सामना - 1 जुलै ते 5 जुलै - बर्मिगहॅम
टी - 20 मालिका - 7 जुलै - साउथम्प्टन9 जुलै - बर्मिगहॅम10 जुलै - Nottingham
एकदिवसीय मालिका - 12 जुलै - लंडन14 जुलै - लंडन17 जुलै - मँचेस्टर भारताचा वेस्ट इंडिज दौरा तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 मालिका - वेळापत्रक अद्याप जारी करण्यात आलेले नाही. जुलै - ऑगस्ट यादरम्यान सामने होण्याची शक्यता आहे.
आशिया चषक (सप्टेंबर)ठिकाण आणि तारखाबाबत अद्याप घोषणा नाही. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा - भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी, तीन टी-20 मालिका खेळणार आहे. तारीख आणि ठिकाणाबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सप्टेंबर - ऑक्टोबर या काळात असणार आहे.
टी- 20 विश्वचषक (ऑक्टोबर - नोव्हेंबर)ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 चा विश्वचषक ऑक्टोबर - नोव्हेंबर यादरम्यान होणार आहे. तारीख आणि ठिकाणाबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. बांगलादेशचा भारत दौरा - नोव्हेंबर-डिसेंबर यादरम्यान बांगलादेश भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे. तारीख आणि ठाकाणीबाबत अद्याप घोषणा झालेली नाही.