Happy Birthday PV Sindhu: भारतासाठी अनेक विक्रम करणारी भारताची शटलर पीव्ही सिंधू (PV Sindhu) आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करीत आहे. वयाच्या 27 व्या वर्षी तिनं अनेक विक्रमांना गवसणी घातलीय. पीव्ही सिंधुनं तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप जिंकण्यापासून तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताचा झेंडा फडकावला. पीव्ही सिंधुच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पाच मोठ्या विक्रमांवर एक नजर टाकुयात, जे आजही आबाधित आहेत.


ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू
भारतीय शटलर पीव्ही सिंधु ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. तिनं 2016 मध्ये रियो ऑम्पिकमध्ये हे रौप्यपदक जिंकलंय. त्यानंतर तिनं ऑलिंम्पिक 2022 मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून देशाचं नाव मोठं केलं. 


बीडब्लूएफ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय
बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पीव्ही सिंधु पहिली भारतीय एकेरी खेळाडू आहे. बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा पराभव केला होता. हे सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी तिनं 2017 आणि 2018 मध्ये या स्पर्धेत संयुक्त रौप्यपदक जिंकलं होतं.


वर्ल्ड टूरचा अंतिम सामना जिंकणारी पहिली भारतीय
पीव्ही सिंधूनं बीडब्लूएफच्या वर्ल्ड टूरच्या अंतिम सामना जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 2018 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी तिनं अशी कामगिरी करून दाखवली होती. त्यावेळी तिनं नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-17 असा पराभव केला होता.


सर्वाधिक वेळ वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचा विक्रम
पीव्ही सिंधूच्या स्टॅमिनाबद्दल नेहमीच चर्चा होते. दरम्यान, 2017 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप दरम्यान तिनं स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ अंतिम सामना खेळला. तिनं ओकुहारा विरुद्ध 110 मिनिटे खेळला. या सामन्यात पीव्ही सिंधुला  21-19, 20-22, 22-20 फरकानं पराभव स्वीकारावा लागला. महिलांची ही दुसरी सर्वात मोठी फायनल होती.


भारतासाठी पाच जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकणारी पहिली महिला
भारतीय जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पाच पदके जिंकणारी पीव्ही सिंधु एकमेव भारतीय आहे. तिनं सुवर्णपदक (2019), रौप्यपदक (2012 आणि 2018), कांस्यपदक (2013 आणि 2014) जिंकलंय.



हे देखील वाचा-