ENG vs IND: बर्मिंगहॅम (Birmingham) कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपलाय. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघ मजबूत दिसत होता. परंतु, चौथ्या दिवसाअखेर या सामन्यावर इंग्लंडचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. भारताकडून मिळालेल्या 378 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघानं तीन विकेट्स गमावून 259 धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला शेवटच्या दिवशी फक्त 119 धावांची गरज असून त्यांच्या 7 विकेट्स शिल्लक आहेत. ज्यामुळं भारताचे मालिका विजयाच्या आशा धुसर दिसत आहेत. दरम्यान, जॉनी बेअरेस्टो (Jonny Bairstow) आणि जो रूटनं (Joe Root) भारतासाठी कर्दनकाळ ठरले आहेत.


भारताच्या मालिका विजयाच्या आशा धूसर
भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात आली होती. या कसोटी मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी मिळवली. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील पाचवा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता. या अखेरच्या सामन्यात इंग्लंडच्या संघानं विजय मिळवल्यास मालिका बरोबरीत सुटणार आहे. यामुळं या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाचा मालिका विजयासह ऐतिहास रचण्याचा प्रयत्न असेल. 


जो रूट आणि जॉनी बेअरेस्टोनं फिरवला सामना
बर्मिंगहॅम कसोटी सामना आता एकतर्फी झाली आहे. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांच्या शतकी भागीदारीनं इंग्लंडचा संघ या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत पोहचलाय. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोघांमध्ये 150 धावांची भागीदारी झाली. जो रूट 76 आणि जॉनी बेअरस्टो 76 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडच्या संघानं दोन धावांत तीन विकेट्स गमावल्यानंतर जो रूट आणि जॉनी बेअरेस्टो क्रीझवर आला. सुरुवातीला दोघांनी इंग्लंडच्या संघाचा डाव सावरला. त्यानंतर धावांचा वेग वाढवून भारताला बॅकफूटवर ढकललं.


हे देखील वाचा-