ENG vs IND: भारतीय संघ सध्या इंग्लंड (India tour of England) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅम (Birmingham) येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी स्टॅडमध्ये बसलेल्या इंग्लंड प्रेक्षकांनी भारतीयांशी गैरवर्तन केलं. एका युजर्सनं ही घटना सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली. एरिक हॉलीज स्टँडमध्ये बसलेल्या भारतीय चाहत्यांवर थेट वर्णद्वेषी टिप्पण्या केल्याचं त्यानं म्हटलं आहे. या प्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डनं दिलगिरी व्यक्त करत पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु केलीय.


ट्वीट-



एजबॅस्टनचे मुख्य कार्यकारी काय म्हणाले?
"आम्ही एजबॅस्टनमध्ये सर्वांसाठी सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण निर्माण करत आहोत, अशा प्रतिक्रिया ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. ट्विटनंतर मी त्या व्यक्तीशी वैयक्तिकरित्या बोललो आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. एजबॅस्टनमध्ये कोणालाही अशी वागणूक देऊ नये. या प्रकरणाची त्वरीत चौकशी केली जाईल", असा इशाराही त्यांनी इंग्लंडच्या चाहत्यांना दिलाय.


बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लंड मजबूत स्थितीत
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारतीय संघानं पहिल्या डावात 416 धावा आणि दुसऱ्या डावात 245 धावा केल्या. तर इंग्लंडच्या संघानं पहिल्या डावात 284 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाला 134 धावांची आघाडी मिळालेल्या भारतीय संघानं इंग्लंडसमोर 378 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं तीन विकेट्स गमावून 259 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज आहे. इंग्लंडकडून दमदार कामगिरी करणारे जो रूट आणि जॉनी बेअरस्टो अजूनही मैदानात उपस्थित आहेत. 


हे देखील वाचा-