Happy Birtday MS Dhoni: भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी आज 41 वर्षांचा झालाय. धोनीनं या वर्षी त्याचा वाढदिवस इंग्लंडमध्ये खास पद्धतीनं साजरा केला. धोनीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2019 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. धोनीच्या 41 वाढदिवसानिमित्त त्याच्याशी संबंधित खास आणि रंजक गोष्टींवर एकदा नजर टाकुयात.


धोनीच्या 41 व्या दिवसानिमित्त 41 रंजक गोष्टी


1) क्रिडाविश्वात उत्कृष्ट कर्णधार म्हणून ओळखला जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या कारकिर्दीची सुरुवात शून्यातून केली. 


2) आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार


3) 2007 मध्ये आफ्रो-आशियाई सामन्यात महेला जयवर्धनेसोबत सहाव्या विकेटसाठी 218 धावांची सर्वोच्च भागेदारी.


4) एकदिवसीय सामन्यात यष्टीरक्षक म्हणून नाबाद 183 धावांची खेळी. 


5) एका एकदिवसीय सामन्यात 10 षटकार मारणारा पहिला खेळाडू


6) टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला कर्णधार


7) सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पदार्पण


8) आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाला चार आणि चॅम्पियन्स लीग टी-20 मध्ये दोन जिंकून दिल्या. 


9) आयपीएलमध्ये 10 फायनल खेळणारा कर्णधार


10) आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं चार ट्रॉफी जिंकल्या.


11)  2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत एक ओव्हर टाकून ट्रॅव्हिस डॉलिनची विकेट घेतली.


12) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बॉल आऊट जिंकणारा एकमेव कर्णधार.


13) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रचंड यश मिळवूनही, एमएस धोनीने कधीही रणजी ट्रॉफी किंवा कोणतीही देशांतर्गत स्पर्धा जिंकली नाही.


14)  41 वर्षात  न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार.


15) 2008 आणि 2009 मध्ये आयसीसी एकदिवसीय प्लेयर ऑफ द इयर.  2007 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित


16)  भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत


17) एमएस धोनीला एक भाऊ देखील आहे, पण एमएसधोनी चित्रपटात त्याचा उल्लेख नाही.


18) 2010/11 मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका अनिर्णित राखली.


19)  5 ते 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8,000 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडू


20)  टी-20 विश्वचषकात 30 पेक्षा जास्त सामन्यांचे नेतृत्व करणारा एकमेव खेळाडू 


21)  कर्णधार म्हणून 2010 आणि 2016 मध्ये दोन आशिया कप जिंकले. 


22)  एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त स्टंपिंग करणारा एकमेव यष्टिरक्षक


23) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 332 सामने खेळले आहेत जे कोणत्याही खेळाडूसाठी सर्वाधिक आहेत.


24)  पाचव्या विकेटसाठी 2000+ धावांची भागीदारी करणारा एकमेव खेळाडू


25) धोनीने आपल्या करिअरची सुरुवात फुटबॉल गोलकीपर म्हणून केली होती.


26)  300 कोटींची वार्षिक ब्रँड व्हॅल्यू नोंदवणारा पहिला खेळाडू


27)  एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.


28) 2009 मध्ये पद्मश्री आणि 2018 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित


29) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या. मार्क बाउचर आणि अॅडम गिलख्रिस्टनंतर तिसऱ्या क्रमांकावर


30) 535 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व (एकदिवसीय- 350, कसोटी- 90,  टी-20- 98)


31) एकूण 288 टी-20 सामन्यांचे नेतृत्व, जे कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात जास्त आहे.


32) 2010 ते 2019 पर्यंत चेन्नई सुपर किंग्जसाठी सलग 143 सामने खेळले.


33) आयपीएलच्या पंधरा हंगामात एकही शतक नाही


34) भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टर होता.


35) धोनी चेन्नईसाठी 13 हंगाम खेळला आहे


36)  एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10000 धावा करणारा 5वा भारतीय खेळाडू ठरला.


37)  कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये 100 हून अधिक सामने जिंकले.


38)  2013 मध्ये भारताला सलग सहा कसोटी सामन्यात विजय मिळवून देण्याचा पराक्रम


39)  धोनीनं सलग दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलंय. 


40) धोनीनं त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत ७ नंबरची जर्सी परिधान केली होती, त्यामुळे त्याची तुलना क्रिस्टियानो रोनाल्डोशीही केली जाते.


41) धोनीनं आपल्या करिअरची सुरुवात रनआऊटने केली होती. डिसेंबर 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध आणि पुन्हा 2019 मध्ये भारतासाठीच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तो रनआऊटच झाला.