ENG vs IND 1st T20: बर्मिंगहॅम कसोटीनंतर भारतीय संघ इंग्लंडशी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना आज (7 जुलै) साउथॅम्प्टनच्या (Southampton) द रोज बाउल (Rose Bowl) स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.  या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. या सामन्यापूर्वी द रोज बाउल मैदानातील पिच रिपोर्ट आणि हवामानाच्या अंदाजाबाबत जाणून घेऊयात.


पिच रिपोर्ट
साउथहॅम्प्टनच्या द रोझ बाउल मैदानात आतापर्यंत 9 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यातील पाच सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवलाय. तर, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं चार सामने जिंकले.  या खेळपट्टीवर फलंदाजांना अधिक मदत मिळते.  या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी 168 आणि दुसऱ्या डावाची 143 धावांची आहे. यामुळं इंग्लंड आणि भारत यांच्यातील टी-20 मालिकेत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.


हवामानाचा अंदाज
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. एका हवामान वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, सॉउथम्पटन येथे गुरूवारी  46 टक्के ढगाळ वातावरण असेल. तर, 39 किमी वेगानं वारे वाहतील. या ठिकाणी कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस आणि किमान 12 अंश सेल्सिअस राहील.


भारताचा टी-20 संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत कृष्णा बुमराह, ऋषभ पंत.


हे देखील वाचा-