Pakistani Cricketer Haider Ali: पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला अत्याचार प्रकरणात अटक; इंग्लंडमध्ये सामना सुरु असताना पोलिसांनी उचलले, पीसीबीने लगेच केले निलंबित
Pakistani Cricketer Haider Ali: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अलीला बलात्काराच्या आरोपाखाली यूके पोलिसांनी अटक केली आहे.

Pakistani Cricketer Haider Ali: पाकिस्तान क्रिकेटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अलीला (Haider Ali) बलात्काराच्या आरोपाखाली यूके पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हैदर अलीविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकारानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हैदर अलीला निलंबितही केले आहे.
HAIDER ALI SUSPENDED BY PCB.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 8, 2025
- Pakistani cricketer Haider Ali has been arrested on charges of sexual molestation in the UK. pic.twitter.com/PdlVxqxCD1
नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तान अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या 24 वर्षीय हैदर अलीविरुद्ध 4 ऑगस्ट रोजी पोलिसांना तक्रार मिळाली. त्यानंतर हैदर अलीला अटक करण्यात आली. दरम्यान, पाकिस्तानचा अ संघ आणि इंग्लंड लायन्सविरुद्ध बेकेनहॅम मैदानावर सामना खेळवण्यात येत होता. या सामनादरम्यान, हैदर अलीला पोलिसांनी अटक केली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हैदर अलीली केले निलंबित-
हैदर अलीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केले आहे. बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्हाला कळले आहे की ग्रेटर मँचेस्टर पोलिस अलीविरुद्ध फौजदारी खटल्याची चौकशी करत आहेत, जो इंग्लंडमध्ये घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. खेळाडूंचे हक्क लक्षात घेऊन, बोर्डाने या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान हैदर अलीला कायदेशीर मदत केली आहे. मात्र सदर प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत हैदर अलीला निलंबित करण्यात येत आहे.
हैदर अली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द-
24 वर्षीय हैदर अली पाकिस्तान क्रिकेट संघासाठी 2 एकदिवसीय आणि 35 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. हैदर अलीने 124 च्या स्ट्राईक रेटने टी-20 मध्ये 505 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या हैदर अलीने 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. हैदर अली लवकरच पुनरागमन करेल असे मानले जात होते, परंतु आता हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.





















