IND Vs WI 3rd T20:  तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना खेळला जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करणार आहे. 


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने शुक्रवारी झालेला दुसऱ्या टी-20 सामना आठ धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी प्राप्त केली. हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील शंभरावा विजय ठरला. या कामगिरीनंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत या दुसऱ्या सामन्यातील अर्धशतकवीरांना 10 दिवसांची विश्रांती देण्यात आलीय. 


संघ-


भारताचा संघ-
ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान.


वेस्ट इंडीजचा संघ-
काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, डॉमिनिक ड्रेक्स, फॅबियन ऍलन, हेडन वॉल्श.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha