IND vs WI, 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला 185 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात तुफानी खेळी करत सुर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. एकेकाळी भारताची धावसंख्या दिडशे पार जाईल की नाही? असं वाटत असताना सुर्यकुमार मैदानात आला. त्यानंतर त्यानं व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) सोबत अखेरच्या पाच षटकात वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांची शाळा घेतली.


इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं वादळी खेळी केली. सुर्यकुमार यादवनं 65 (1 चौकार, 7 षटकार) आणि व्यंकटेश अय्यरनं नाबाद 35 (4 चौकार, 2 षटकार) धावांची खेळी केली. ज्यामुळं भारतानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजसमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. 


बीसीसीआयचं ट्वीट-



ज्यावेळी सुर्यकुमार फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला, त्यावेळी भारताचा स्कोर 9.4 षटकात 66 धावा इतका होता. मात्र, त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं त्याची विकेट्स गमावली. परंतु, त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर अखेरच्या पाच षटकात आक्रमक फलंदाजी केली. दरम्यान, सुर्यकुमार यादवनं 28 चेंडूत त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान, सुर्यकुमारचा स्ट्राईक रेट 209.68 होता. 20 व्या षटकात त्यानं रोव्हमन पॉवेलच्या गोलंदाजीवर 3 षटकार मारले. मात्र, अखेरच्या चेंडूवर 64 धावांवर असताना सुर्यकुमार यादव झेलबाद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha