एक्स्प्लोर

IPL Mega Auction 2025: ग्लेन मॅक्सवेल अन् आरसीबीमध्ये बिनसलं? ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूनं उचललं मोठं पाऊल

IPL 2025 Mega Auction: IPL 2025 मध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या मेगा ऑक्शननंतर काही खेळाडूंचे संघ बदलल्याचं पाहायला मिळतील. 

नवी दिल्ली: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या मेगा ऑक्शनच्या निमित्तानं वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत. क्रिकेटमधील नामांकित खेळाडू मेगा ऑक्शननंतर वेगवेगळ्या संघांमध्ये पाहायला मिळू शकतात. आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन डिसेंबर आणि फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. त्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडू दुसऱ्या संघात जाण्याची शक्यता आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये (Royal Challengers Bengaluru) देखील बदल होण्याची शक्यता आहे. स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये बिनसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं आगामी आयपीएल 2025 च्या हंगामात ग्लेन मॅक्सवेल आरसीबीकडून खेळताना पाहायला मिळणार का प्रश्न आहे.  

ग्लेन मॅक्सवेलनं काय केल?      

मेगा ऑक्शनपूर्वी स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं मेगा ऑक्शनपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे.  ग्लेन मॅक्सवेलनं आरसीबीला अनफॉलो केल्यानं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आगामी आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी हे पाऊल उचललं गेलं असल्यानं ग्लेन मॅक्सवेल आरसीबीकडून खेळणार की दुसऱ्या संघाकडून खेळणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. आरसीबीच्या संघातून ग्लेन मॅक्सवेलला संघाबाहेर जावं लागण्याची शक्यता अंदाज देखील वर्तवला जात आहे.  

2021 पासून ग्लेन मॅक्सवेल आरसीबीसोबत

आयपीएल 2021 च्या लिलावावेळी 14.25 कोटी रुपये रक्कम मोजून आरसीबीनं ग्लेन मॅक्सवेला संघात घेतलं होतं. आयपीएलच्या 2023 च्या हंगामात मॅक्सवेलनं 14 मॅचमध्ये 400 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या 17  व्या हंगामात ग्लेन मॅक्सवेल अपयशी ठरला.  10 मॅचमध्ये तो केवळ 52  धावा करु शकला होता.  

ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 134 सामने खेळले आहेत. मॅक्सवेलनं 156.73 च्या स्ट्राइक रेटनं 2771 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 18  अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 134 सामन्यांमध्ये मॅक्सवेलनं 8.28 च्या इकोनॉमीनं 37 विकेट घेतल्या आहेत.  

आरसीबी विजेतेपदापासून दूर

रॉयल चॅलेंजर्स बगंळुरुला आयपीएलच्या 17 व्या हंगामापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असून देखील आरसीबीची विजेतेपदाची पाटी कोरी राहिली आहे. आयपीएलच्या  17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सुरुवातीच्या पराभवानंतर दमदार कामगिरी केली होती. दमदार कामगिरी करत आरसीबीनं उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली होती. मात्र, त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आगामी आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरु शकते. त्यासाठी काही नव्या खेळाडूंना देखील संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.  

संबंधित बातम्या :

मुलाचा वाढदिवस अन् हार्दिक पांड्या भावूक; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, तू मला दररोज...

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-20 सामना; टीम इंडिया चार बदलांसह मैदानात उतरणार?, पाहा संभाव्य Playing XI

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget