Gautam Gambhiron Virat Kohli and Rohit sharma : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 (WTC) मधील टीम इंडियाचा प्रवास 2024-25 ची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (BGT) हरल्याने संपला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 3-1 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाला 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यात यश आले. यासह सलग तिसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचे टीम इंडियाचे (Team India) स्वप्न भंगले. या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) खूपच नाराज दिसला. त्याने थेट कडक शब्दात बोलताना दिग्गज खेळाडूंपासून युवा खेळाडूंपर्यंत सर्वांना कडक आदेश दिले.
सामना गमावल्यानंतर संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेत संघाविषयी आपले मत मांडले. यावेळी गंभीर चांगलाच रागावलेला दिसत होता. जास्त करून वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवरही तो नाराज होता. प्रत्येकाने देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे, असे तो स्पष्टपणे म्हणाला. तो म्हणाला, 'सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक असले पाहिजे. यामुळे खेळाडूंना चांगला सराव तर होतोच शिवाय त्यांची लयही कायम राहते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, टीम इंडियाचे अनेक सीनियर खेळाडू आहेत जे बर्याच काळापासून देशांतर्गत क्रिकेट खेळलेले नाहीत. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आहे. त्यामुळे गौतम गंभीर हा इशारा थेट त्या दोघांनाच होता. या मालिकेदरम्यानच रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीच्या बातम्याही आल्या होत्या. कारण खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या रोहितने सिडनी कसोटी सामन्यातूनही स्वतःला बाहेर ठेवले होते. गंभीरने म्हटले आहे की, "मी कोणत्याही खेळाडूच्या भविष्यावर भाष्य करू शकत नाही. हे खेळाडूंवर अवलंबून आहे. पण भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते ते करतील."
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये फ्लॉप
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी हा दौरा खूपच वाईट होता. विराटला 5 सामन्यांच्या 9 डावात केवळ 190 धावा करता आल्या, ज्यात 1 शतकाचा समावेश होता. याशिवाय उरलेल्या 8 डावात त्याला एकदाही 50 धावांचा टप्पा गाठता आला नाही. दुसरीकडे, रोहित शर्माने 3 सामन्यांच्या 5 डावात केवळ 31 धावा केल्या. रोहितने 6.20 च्या खराब सरासरीने या धावा केल्या. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने 3 सामन्यांच्या 5 डावात 27.00 च्या सरासरीने 135 धावा केल्या. ज्यामध्ये 1 अर्धशतकाचाही समावेश होता. या मालिकेत जडेजाने 4 विकेट्सही घेतल्या.
हे ही वाचा -