Gautam Gambhir on Shikhar Dhawan Retirement : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले आहे. टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकून चाहत्यांना खूश केले. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन स्टार खेळाडूंनी टी-20 मधून निवृत्ती घेऊन करोडो भारतीय चाहत्यांची मने तोडली. आता दिग्गज फलंदाज शिखर धवननेही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.


टीम इंडियाच्या 'गब्बर'ने शनिवारी 24 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून निवृत्तीची घोषणा केली. एका भावूक व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणाला की, "सर्वांना नमस्कार, आज मी अशा एका वळणावर उभा आहे जिथून मागे वळून पाहिले तर चांगल्या आठवणी आहेत, पण पुढे संपूर्ण आयुष्य आहे. भारतासाठी क्रिकेट खेळणे हे माझ्या जीवनाचे ध्येय होते ते मी पूर्ण केले. पण आयुष्यात पुढे जायचे असेल तर पुस्तकाची पाने उलटणे आवश्यक असते. तेच मी करत आहे. 


पुढे म्हणाला तो की, मी माझ्या देशासाठी मनसोक्त क्रिकेट खेळलो याचे मला समाधान आहे. मला क्रिकेट खेळायची संधी दिल्याबद्दल बीसीसीआय आणि दिल्ली क्रिकेट संघटनेटेही आभार. आता यापुढे देशासाठी खेळता येणार नाही याचे दु:ख करत बसण्यापेक्षा आतापर्यंत जे खेळलो त्याचे मला मनापासून समाधान आहे. शिखर धवनच्या निवृत्तीनंतर नुकतेच टीम इंडियाचे मुख्य कोच बनलेल्या गौतम गंभीरची प्रतिक्रिया आली आहे.  


शिखर धवनच्या निवृत्तीवर गंभीरची पोस्ट


टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि शिखर धवन एकमेकांसोबत भरपूर क्रिकेट खेळले आहेत. दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळत होते. धवन जेव्हा भारतीय संघात आपले स्थान तयार करत होता, तेव्हा गंभीर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर होता. विशेष म्हणजे गौतम गंभीरने 2013 मध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता आणि त्याच वर्षी धवनने कसोटी पदार्पण करून खळबळ उडवून दिली होती.


शिखर धवनच्या निवृत्तीनंतर गौतम गंभीरने आपल्या जुन्या सहकाऱ्यासाठी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना लिहिले की, "शिकी (शिखर धवन) चे अभिनंदन, एका अप्रतिम कारकिर्दीसाठी, मला माहित आहे की तु भविष्यात जे काही करशील त्यात तुला आनंद मिळले.




शिखर धवनची कारकीर्द


शिखर धवनने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले. पहिल्या वनडे सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. गब्बरने दोन वर्षांनंतर कसोटी पदार्पणात मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावून आपण लांब रेसचा घोडा असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर अनेक वर्षे तो टीम इंडियाचा नियमित सदस्य राहिला. शिखर धवनने भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 10 हजारांहून अधिक धावा आहेत. गब्बरने आयपीएलमध्ये 222 सामने खेळले असून 35.07 च्या सरासरीने 6,768 धावा केल्या आहेत.


हे ही वाचा :


Shikhar Dhawan Announces Retirement : मोठी बातमी! भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर