Arjun Tendulkar sold in IPL Mega Auction 2025 : मुंबई इंडियन्सकडून 3 हंगाम खेळणारा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2025 मध्ये कोणीही खरेदीदार मिळाला आहे. आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरचे नाव समोर आले तेव्हा कोणत्याही संघाने बोली लावली नाही. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपये देऊन संघात घेतले. अर्जुन तेंडुलकर हा दिग्गज खेळाडू सचिनचा मुलगा असून गेल्या तीन वर्षांपासून मुंबई संघात खेळत होता. या वर्षी पण तो मुंबई संघात खेळताना दिसणार आहे. गेल्या हंगामात मुंबईने अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी दिली होती. 






अर्जुन तेंडुलकर 2021 मध्ये आयपीएलमध्ये प्रथमच मुंबई इंडियन्स संघाचा भाग बनला होता. या संघाने त्याला 20 लाख रुपयांना खरेदी केले. यानंतर, तो पुन्हा 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग बनला आणि त्याला या हंगामात 30 लाख रुपये मिळाले. 2022 ते 2024 पर्यंत तो या संघाचा भाग राहिला. 2024 च्या हंगामानंतर मुंबईने त्याला सोडले होते, या हंगामात पण त्याला 30 लाख रुपये देऊन संघात घेतले. अर्जुनने या लीगमध्ये खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांमध्ये 13 धावा केल्या होत्या आणि तेवढ्याच सामन्यांमध्ये फक्त 3 विकेट घेतल्या होत्या. अर्जुनच्या टी-20 कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, 23 टी-20 सामन्यांमध्ये 26 विकेट घेतल्या आहे आणि त्याचा इकॉनॉमी रेट प्रति ओव्हर 8.70 आहे.


अर्जुन सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळत आहे जिथे त्याने सर्व्हिसेसविरुद्ध चांगली कामगिरी केली. अर्जुनने या सामन्यात 3 षटकात केवळ 19 धावा दिल्या. मात्र, मुंबईविरुद्ध त्याचा पराभव झाला, जिथे त्याने 4 षटकांत 48 धावा दिल्या. अर्जुनने रणजी ट्रॉफीमध्येही गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते, जिथे गेल्या 3 सामन्यात त्याने 10 विकेट्स घेतल्या होत्या.


हे ही वाचा -


Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction : एक बिहारी सबपे भारी, 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस, युवा खेळाडूसाठी राजस्थानं मोजले कोट्यवधी रुपये


IPL 2025 Mega Auction : कोहलीशी पंगा पठ्ठ्याला पडला महागात... लिलावात अनसोल्ड; अवघ्या 18 सामन्यांनंतर IPL ची कारकीर्द संपली?