New Zealand beat India 2nd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे ही कसोटी मालिकाही गमावली. न्यूझीलंडने मालिकेत इतिहास रचला आणि 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. त्याचवेळी न्यूझीलंडने भारताला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासोबतच टीम इंडियाचा भारतात सलग कसोटी मालिका जिंकण्याची मालिकाही खंडित झाली.


खरंतर, भारताने 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. यापूर्वी 2012-13 च्या भारत दौऱ्यात इंग्लंडने टीम इंडियाचा कसोटी मालिकेत पराभव केला होता. तेव्हापासून भारतीय संघाचे घरच्या मैदानावर वर्चस्व होते. त्याने सलग 18 मालिका जिंकल्या होत्या, मात्र आता ही विजयी मालिका थांबली आहे.  






पुणे कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या किवी संघाने 259/10 धावा फलकावर लावल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेली टीम इंडिया अवघ्या 156 धावांत गारद झाली. यादरम्यान रवींद्र जडेजाने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. यादरम्यान संघाचे एकूण पाच फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत.


दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर 198/5 धावा केल्या होत्या. या स्कोअरसह संघाने 301 धावांची आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघ न्यूझीलंडला किती धावा करू शकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. पुणे कसोटीतून मालिका पणाला लागली आहे. 


तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने तासाभरात पाच विकेट गमावल्या. आणि न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात सर्वबाद 255 धावांवर आटोपला. टीम इंडियाला विजयासाठी 359 धावांची लक्ष्य दिले. न्यूझीलंडसाठी दुसऱ्या डावात कर्णधार टॉम लॅथमने 10 चौकारांच्या मदतीने 86 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. तर भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 4 बळी घेतले. अशा परिस्थितीत टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 359 धावांचे लक्ष्य होते. मात्र यशस्वी जैस्वाल वगळता एकही फलंदाज या डावात जास्त काळ टिकू शकला नाही, त्यामुळे भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.


हे ही वाचा -


Virat Kohli : 'वेळ आली आता नारळ देण्याची...' खराब कामगिरीनंतर विराट कोहली घेणार निवृत्ती? लंडनला होणार शिफ्ट?