T20 World Cup 2024 Marathi News: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2024 मधील आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला. या विजयानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला आहे. मात्र, या सगळ्या आनंदादरम्यान चाहत्यांसाठी एक वाईट बातमीही आहे. या विश्वचषकानंतर भारताच्या टी-20 संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. टी-20 संघात कर्णधारापासून मुख्य प्रशिक्षकांपर्यंत अनेक बदल होणार आहेत.


टी-20 संघाला मिळणार नवीन कर्णधार-


टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्यासोबत माजी कर्णधार विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी भारतासाठी शेवटचा टी-20 सामना विश्वचषकातील दक्षिण अफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळला. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या टी-20 संघात दिसणार नाहीत. रोहित शर्माने रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टी-२० संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या अनेकदा भारतीय टी-20 संघाची धुरा सांभाळताना दिसला. रोहित शर्माच्या काळापर्यंत कोणत्याही टी-20 संघाचा कायमस्वरूपी कर्णधार नव्हता, मात्र आता रोहितनंतर संघाला कायमस्वरूपी कर्णधार मिळणार आहे. आता भारताच्या टी-20 संघाचा कायमस्वरूपी कर्णधार कोणाला केले जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






विराट कोहलीची जबाबदारी कोण घेणार?


विराट कोहलीची जागा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही. यंदाचा विश्वचषक वगळता विराट कोहली टी-20 फॉरमॅटमध्ये भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा. अशा स्थितीत कोहलीनंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूची जबाबदारी मोठी असेल. आता तिसऱ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूला संधी दिली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


मुख्य प्रशिक्षकही बदलणार-


टी-20 विश्वचषक संपल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला. राहुल द्रविड हे तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रशिक्षक होते. आता टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये नवा प्रशिक्षक मिळणार आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, या पदाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


राहुल द्रविड यांच्या प्रयत्नांना यश-


भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी निरोपाची ही अप्रतिम भेट ठरली. नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारतीय संघात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडूंमध्ये ताळमेळ बसवून ड्रेसिंग रुममधील वातावरण हसता ठेवण्याचा राहुल द्रविड यांनी प्रयत्न केला. याच प्रयत्नांना आज यश मिळाले. 


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: जिंकला, हसला, रडला, तिरंगा रोवला; विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे अंगावर काटा आणणारे टॉप 15 फोटो


T20 World Cup 2024 Team India Prize Money: विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल; द. अफ्रिकेलाही कोट्यवधी रुपये, कोणाला किती मिळाले?


T20 World Cup 2024 Team India Celebration: विश्वचषक घेताना रोहित शर्माची अनोखी एन्ट्री; सोशल मीडियावर ट्रेंड, पाहा संपूर्ण Video