T20 World Cup 2024: २००७ ला भारताने पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला होता त्यानंतर भारताला कधीही T20 वर्ल्ड कपला हात घालता आला नव्हता. २०२४ च्या या T20 वर्ल्ड कपमध्ये भारत अंतिम सामन्यापर्यंत अपराजित राहिला होता. वर्ल्ड कप भारताच्याच नावावर लागेल असा विश्वास सगळ्यांना वाटत होता. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सेकंड हाफमध्ये वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी करताना कठिण होईल असा विश्वास कप्तान रोहित शर्माला वाटत होता. सलामीला आलेल्या विराट कोहलीच्या ५९ चेंडूवर केलेल्या ७६ धावांमुळे भारताने १७७ धावांपर्यंत मजल मारली, यात अक्षर पटेलच्या ३१ चेंडूत ४७ धावा आणि शिवम दुबेच्या १६ चेंडूत २७ धावांचाही मोठा वाटा होता.

 

दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यांचे दोन फलंदाज लवकर बाद झाले पण आफ्रिकन फलंदाजांनी धावफलक हलता ठेवला. अक्षर पटेलने ९व्या षटकात ट्रिस्टन स्टब्सचा त्रिफळा उडवला आणि आफ्रिकेचा तिसरा झटका दिला. त्यानंतर तेराव्या षटकात अर्शदीपने क्विंटन डिकॉकला कुलदीपकडे झेल देण्यास भाग पाडले आणि आफ्रिकेला चौथा झटका मिळाला. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिका भारतावर वरचढ झाला आणि त्यांना ३० चेंडूंमध्ये ३० धावा करायच्या होत्या. भारत उपविजेता होणार असेच वाटत होते. पण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काहीही सांगता येत नाही आणि या सामन्यात तेच झाले. आफ्रिकेचे मिलर आणि क्लासेन मैदानात आणि दोघेही पूर्णपणे भरात. भारतीय गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत होतो. आणि याचवेळी कर्णधार रोहित शर्मानं चेंडू दिला जसप्रीत बुमराहच्या हाती. संकटकाळी बुमराहच धावून येत असल्याने रोहितने बुमराहकडे चेंडू सोपवला. बुमराहने विकेट घेतली नाही पण सोळाव्या षटकात फक्त चार धावा दिल्या.

 

आफ्रिकेला आता २४ चेंडूंत २६ धावा करायच्या होत्या. सतराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्यानं क्लासनला वाईड चेंडू टाकून रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. पूर्भण रातील क्लासन तंबूत परतला आणि भारतीय टीमचा विजयाचा दिवा लुकुलूकू लागला.
आता आफ्रिकेला १८ चेंडूंत २२ धावा हव्या होत्या रोहित शर्माने पुन्हा बुमराहच्या हाती चेंडू सोपवला. बुमराहने पहिल्या दोन चेंडूवर एकही धाव दिली नाही. तिसऱ्या चेंडूवर, बुमराहने यान्सनचा त्रिफळा उडवला आणि आफ्रिका विजयापासून दूर जाऊ लागली. उरलेल्या दोन चेंडूंमध्ये बुमराहने फक्त एक धाव दिली. १९व्या षटक टाकण्यासाठी रोहितने अर्शदीपला बोलावले. अर्पशदीपने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. तिसऱ्या चेंडूवर केशव महाराजला एक धाव घेता आली. त्यानंतर उरलेल्या दोन चेंडूंवर फक्त तीन धावा आल्या. आणि आफ्रिकेला शेवटच्या षटकात १६ धावा करायच्या होत्या. लक्ष्य कठिणही होते आणि सहज साध्यही होते.

 

रोहितने शेवटच्या षटकाची जबाबदारी सोपवली हार्दिक पंड्यावर. मिलर समोर असल्याने तो काहीही करू शकतो याची जाणीव असल्याने हार्दिक पंड्यानं वाईड चेंडू टाकला. मिलने तो चेंडू जोरात फटकावला षटकार जाणार असे वाटत असतानाही सूर्यकुमार यादवने अद्भुत, अकल्पनातीत, अविश्वसनीय झेल पकडला आणि तिथेच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. सीमारेषेवरच्या आत सूर्यकुमारने झेल पकडला पण त्याचा तोल गेल्याने तो सीमारेषेच्या बाहेर जाणार होता तेवढ्यात प्रसंगावधान दाखवत त्याने चेंडू वर फेकला, सीमारेषेबाहेर जाऊन सूर्यकुमार पुन्हा मैदानात आला आणि त्याने ते झेल पकडला आणि मिलर पॅव्हेलियनमध्ये परतला तो भारताच्या हातात विश्वकप देऊनच. मिलर गेल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला ५ धावात १६ धावा करायच्या होत्या. बुमराहच्या दुसऱ्या चेंडूवर रबाडाने चौकार मारला, आता शेवटच्या चार चेंडूंमध्ये १२ धावा हव्या असताना तिसऱ्या चेंडूवर एक धाव नघाली, चौथ्या चेंडूवर महाराजने एक धाव काढली. आता दोन चेंडूत दक्षिण आफ्रिकेला दहा धावा हव्या होत्या. हार्दिकनं वाईड बॉल टाकला आणि आफ्रिकेला दोन चेंडूत ९ धावा करण्याचं लक्ष्य मिळालं. पाचव्या चेंडूवर रबाडानं कुलदीप यादवच्या हाती झेल दिला. शेवटच्या चेंडूवर आफ्रिकेनं फक्त एक धाव काढली आणि भारताने T20 विश्वकपावर आपले नाव कोरले आणि इतिहास घडवला.