Team India For West Indies Series: भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) वेस्टइंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली. पण या सिलेक्शनवर माजी निवडकर्ते आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम समाधानी नसून त्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी ऋतुराज गायकवाडबद्दल सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने आयपीएल 2021 मध्ये कमाल प्रदर्शन केलं असतानाही त्यांना टी20 संघात स्थान मिळालेलं नाही. वनडे टीममध्ये तो असला तरी टी20 संघात न घेतल्याने सबा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 


ते म्हणाले, "ऋतुराज गायकवाडची टी20 संघात निवड झालेली नाही. त्याला वनडे टीममध्ये घेतलं आहे. त्याच्या टी20 सामन्यांतील प्रदर्शावर त्याचं सिलेक्शन होऊनही अशाप्रकारचा निर्णय धोडा विचित्र आहे. 


वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान 


वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.  


वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक 


एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद


टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha